कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील नवीन महाविद्यालये, विद्याशाखा आणि अभ्याक्रमांची निश्चिती होणार आहे. त्यासाठीच्या सन २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये स्वीकारावयाच्या प्रस्तावांचा शैक्षणिक बृहत आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. त्याबाबत विद्यापीठाशी संबंधित घटकांची मते जाणण्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्णांत ७ जुलैपासून बैठका घेणार आहेत.या आराखड्याद्वारे कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्णांत कोणत्या ठिकाणी नवीन महाविद्यालय, विद्याशाखा आणि अभ्यासक्रमाची आवश्यकता आहे, हे निश्चित केले जाणार आहे. त्यादृष्टीने शैक्षणिक क्षेत्रातील व समाजातील विविध घटकांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करून त्यांची मते व माहिती घेऊन कार्यवाही होणार आहे. यासाठी समिती नियुक्त केली आहे. कोल्हापूरसाठीच्या समितीत प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे (समन्वयक), डॉ. अनिल गवळी, पी. वाय. माने, प्राचार्य डॉ. पी. एन. चौगुले, सांगलीच्या समितीमध्ये डॉ. बी. एस. गवळी (समन्वयक), राजेंद्र आर. डांगे, प्राचार्य डॉ. बी. एन. पवार, डॉ. डी. के. मोरे आणि साताऱ्यासाठी चित्रलेखा कदम (समन्वयक), डॉ. आर. जी. फडतारे, अमित कुलकर्णी, प्राचार्य डॉ. वाय. एस. पाटणे यांचा समावेश आहे.जिल्ह्णानिहाय बैठकींना विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शैक्षणिक संस्था, लोकप्रतिनिधी व इतर सर्व इच्छुक घटकांच्या प्रतिनिधींनी स्वखर्चाने उपस्थित राहावे. ज्या घटकांना नवीन महाविद्यालये, विद्याशाखा, अभ्यासक्रमाचे नियोजित स्थळ सुचवावयाचे आहे त्यांनी विहित नमुन्यांमध्ये समन्वयकांकडे माहिती सादर करावी. त्याचा नमुना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (६६६.४ल्ल्र२ँ्र५ं्न्र.ंू.्रल्ल) बीसीयुडी या लिंकवर उपलब्ध आहे. - डॉ. आर. बी. पाटील, संचालक, बीसीयुडी
शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक बृहत् आराखड्याचे काम सुरू
By admin | Published: June 18, 2015 1:17 AM