शहरं
Join us  
Trending Stories
1
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
5
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
7
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
8
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
9
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
11
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
12
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
13
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
15
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
16
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
17
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
18
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
19
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन

मंदिराच्या असुविधांवर कार्यकर्त्यांची कानउघडणी

By admin | Published: September 16, 2014 11:59 PM

अजित पवार यांनी घेतले महालक्ष्मीचे दर्शन

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई)च्या दर्शनासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंदिर परिसरातील अस्वच्छता, हेरिटेज वास्तूची न घेतलेली काळजी आणि रखडलेला विकास निधी यावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची कानउघडणी केली. यावेळी पवार यांनी मंदिरासाठी निधी आणणे ही स्थानिक नेत्यांची जबाबदारी असल्याचे सांगितले.दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज, मंगळवारी सकाळी अकराच्या दरम्यान अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर प्रदक्षिणा मारताना त्यांना मंदिराच्या दगडी भिंतीचे टवके उडालेले दिसले. त्यावर संगीता खाडे यांनी संगमरवरी फरशी काढल्याने भिंतीची अशी अवस्था झाल्याचे सांगताच पवार यांनी हेरिटेज वास्तूचे काम करताना काळजी घ्यायला पाहिजे होती, असे कसे काम केले, अशा शब्दांत सुनावले. मंदिराच्या आवारात घालण्यात आलेल्या फरशीवरही त्यांनी कसली पाय भाजणारी फरशी बसवलीय, असेही सुनावले. तसेच भवानी मंडप परिसरातील अस्वच्छतेबद्दल नगरसेवक आदिल फरास यांनाही दम भरला. (प्रतिनिधी)खानविलकर कुटुंब पक्ष सोडणार नाहीत..प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्नी वरदा व मुलगी आदिती यांच्यासमवेत देवीचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना तटकरे यांनी कालच काही वर्तमानपत्रातून वाचण्यात आले की, खानविलकर कुटुंबीय पक्ष सोडणार; पण आम्हाला खात्री आहे की, ते राष्ट्रवादी सोडणार नाहीत, असा आशावाद व्यक्त केला.