कामगारांसाठीच्या आरटीपीआर चाचणीची अट रद्द करावी, अशी मागणी उद्योजकांनी केली. त्याबाबत कामगारमंत्री मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी बैठक झाली. जिल्ह्यात सुमारे तीन लाख कामगार आहेत. ती संख्या लक्षात आरटीपीसीआर चाचणी करणे खर्चिक, वेळखाऊ ठरणारे आहे. त्यामुळे आरटीपीसीआर चाचणी रद्द करून लसीकरण करावे, अशी मागणी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मेनन यांनी केली. उद्योग बंद राहिले तर राज्याला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊन जाहीर झाले, तरी त्यातून उद्योगक्षेत्राला सवलत द्यावी, अशी मागणी उपस्थित उद्योजक, विविध औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. त्यावर संबंधित मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. कामगारांच्या ॲन्टिजन टेस्ट आणि लसीकरणासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल. प्रत्येक औद्योगिक वसाहतींसाठी एक संपर्क अधिकारी नेमण्यात येईल, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले. या बैठकीस इंजिनिअरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष हर्षद दलाल, ‘स्मॅक’चे अध्यक्ष अतुल पाटील, ‘गोशिमा’चे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस, ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष संजय शेटे, ‘मॅक’चे अध्यक्ष गोरख माळी, ‘आयआयएफ’चे अध्यक्ष सुमित चौगुले, उद्योजक दीपक पाटील, अभय पंडितराव, संजय पेंडसे, राजू पाटील, प्रदीप व्हरांबळे उपस्थित होते.
चौकट
प्रशासनाला मदत करणार
कामगारांच्या ॲॅन्टिजन टेस्ट, लसीकरणाबाबत आवश्यक ती सर्व मदत उद्योजकांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला करण्यात येईल, असे सचिन मेनन, श्रीकांत पोतनीस यांनी सांगितले.
फोटो (१२०४२०२१-कोल-उद्योजक बैठक) : कोल्हापुरात सोमवारी कामगारांच्या लसीकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात कामगारमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि विविध औद्योगिक संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधींची बैठक झाली.
===Photopath===
120421\12kol_1_12042021_5.jpg
===Caption===
फोटो (१२०४२०२१-कोल-उद्योजक बैठक) : कोल्हापुरात सोमवारी कामगारांच्या लसीकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात कामगारमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि विविध औद्योगिक संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधींची बैठक झाली.