कोल्हापूर : जिल्ह्यात महापूर व अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या जागतिक बॅँकेच्या पथकाने आज विविध ठिकाणी भेट दिली. या पथकात सात तपासणी अधिकाऱ्यांचा समावेश असून, चार पथके सांगली, राधानगरी, शिरोळ आणि कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागांना भेट देउन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.एका पथकाने सांगलीतील नुकसानीची पाहणी केली. कोल्हापूरातील पथकाने करवीर तालुक्यातील आंबेवाडी तसेच चिखली गावांची तसेच शाहूपुरी, बापट कॅम्प, गंगावेश, आदी भागांना भेट देऊन पाहणी केली.विमानतळावर सकाळी या पथकाचे आगमन झाले. त्यानंतर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्यासह मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रविण परदेशी यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर एक पथक सांगलीकडे रवाना झाले. उर्वरित तीन पथके वेगवेगळ्या भागांच्या दौऱ्यावर निघाले.पहिल्या पथकाने बापट कॅम्प, तावडे हॉटेल, इचलकरंजी, आवाडे मळा तेथून शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी, कुरुंदवाड, खिद्रापूर, हुपरी येथील पूरस्थितीची पाहणी केली. दुसºया पथकाने शिंगणापूर पंपिंग हाऊस, दुधाळी, जयंतीनाला, शिवाजी पूल, गंगावेश परिसराची पाहणी केली तर तिसºया पथकाने राजाराम बंधारा, राधानगरी धरण, धामणी प्रकल्पाला भेट दिली.महापूर व अतिवृष्टीने तुटलेले रस्ते, इमारतींची पडझड, उड्डाणपूल, रेल्वे, शासकीय कार्यालयाच्या पडझडीची माहिती या पथकाने घेतली. या पथकात जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुंबई महानरपालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी, अनुप कर्नाथ, पूनम अहलुवालिया, राज सिंग, पियूष सेकसरीया, राजन सामंतारगे, विजयशेखर कालककोंडा, आदी अधिकारी सहभागी झाले आहेत.
जागतिक बँकेचे पथक कोल्हापुरात : महापुरातील नुकसानीची केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 5:31 PM
कोल्हापूर जिल्ह्यात महापूर व अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या जागतिक बॅँकेच्या पथकाने आज विविध ठिकाणी भेट दिली. या पथकात सात तपासणी अधिकाऱ्यांचा समावेश असून, चार पथके सांगली, राधानगरी, शिरोळ आणि कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागांना भेट देउन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
ठळक मुद्दे जागतिक बँकेचे पथक कोल्हापुरात :सात जणांचा सहभाग महापुरातील नुकसानीची केली पाहणी