शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
2
घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
3
आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल
4
पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग
5
कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान
6
आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला : अजित पवार
7
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक
8
कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 
9
कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार अमंलबजावणी
10
अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह
11
जर्मनी, जपानमध्ये आजही का होतात बॉम्बस्फोट?
12
फक्त गणना की जातगणना? सध्या औत्सुक्याचा विषय, पण उत्तर लवकरच मिळेल 
13
सरकारकडून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न, प्रियांका गांधी यांचा प्रचारसभेत आरोप
14
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास तयार, पूर्व लडाखमध्ये डेमचोक आणि डेपसांगवर तोडगा अंतिम टप्प्यात 
15
निदान कुलगुरुंना तरी राजकारणापासून दूर असू द्या !
16
ढोंगी लोकांच्या भुलाव्याला आपण का फसत गेलो?
17
नायजेरियन्सच्या ड्रग्ज पार्टीवर छापा, २६ लाख ७७ हजाराचे एमडी हस्तगत; २० नायजेरियनवर गुन्हा दाखल
18
हिवाळ्यात मुंबईतून रोज ९६४ विमानांच्या फेऱ्या
19
बी. फार्मसीच्या प्रवेशाला आचारसंहितेचा फटका, महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया रखडल्याने प्रक्रिया स्थगित
20
उलवेतून १ कोटीचे कोकेन हस्तगत, आफ्रिकन व्यक्तीला अटक

कोल्हापूर: वारणानगरमध्ये उभारले जागतिक दर्जाचे तारांगण, लवकरच सर्वांसाठी खुलं होणार

By समीर देशपांडे | Published: July 09, 2022 7:10 PM

जर्मनच्या कार्ल झाईज कंपनीच्या या प्रकल्पासाठी वारणा संस्था समूहाने साडेचार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मुंबई, बंगळुरूनंतरचे जागतिक दर्जाचे तारांगण उभारण्यात आले आहे.

समीर देशपांडेकोल्हापूर : सहकाराच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांतिकारी बदल घडवणाऱ्या वारणानगरमध्ये आता विज्ञानाची गुढी उभारली आहे. शालेय वयापासून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणीव निर्माण करण्यासाठी सायन्स ॲण्ड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटरच्या पाठोपाठ आता मुंबई, बंगळुरूनंतरचे जागतिक दर्जाचे तारांगण उभारण्यात आले आहे. लवकरच हे तारांगण सर्वांसाठी खुले केले जाणार आहे.जर्मनच्या कार्ल झाईज कंपनीच्या या प्रकल्पासाठी वारणा संस्था समूहाने साडेचार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अमेरिकन कंपनीचा डूम, जर्मनीचे प्रोजेक्टर आणि कोलकात्याच्या कंपनीकडून संचलन असलेल्या वातानुकूलित दालनातून आपण अवकाश दर्शन करू शकतो. ग्रहांचे संक्रमण, ब्रह्मांड, आकाशगंगा, तारे, तारकासमूह, कालक्रमानुसार पृथ्वीचा झालेला प्रवास, वातावरणातील बदल, चंद्र, सूर्याबद्दल शास्त्रीय माहिती उच्च दर्जाच्या व्हिडिओद्वारे पाहता येणार आहे. आपल्या डोक्यावर असणारे हे तारांगण किती अनंत, प्रचंड आणि निसर्गाची ताकद दाखवणारे आहे. याचेच प्रत्यंतर येथे येते.महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी सायन्स ॲण्ड टेक्नाॅलाॅजी कमिशनच्या माध्यमातून प्रसिद्ध अणू शास्त्रज्ञ डाॅ. अनिल काकोडकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे सेंटर उभारण्यात आले आहे. सर्व शास्त्रे, गणित, इलेक्ट्राॅनिक्समधील मूलभूत तत्त्वे सोप्या पद्धतीने सांगणारे प्रयोग या ठिकाणी विद्यार्थी करू शकतात. सांकेतिक भाषेतून संदेश निर्गमित करण्याच्या पद्धतीसारख्या वैज्ञानिक संकल्पनांची ओळख होते. २४ फेब्रुवारी २०१७ ला सुरू करण्यात आलेल्या या सेंटरचा आतापर्यंत राज्यभरातील ४० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. जगभरातील आणि भारतातील विज्ञान नोबेल विजेत्यांची ओळखही या ठिकाणी होते. पाण्याचा भोवरा कसा तयार होतो इथपासून कार्टून कशी तयार केली जातात इथपर्यंतची माहिती इथे मिळते.

दूरदृष्टीचे तात्यासाहेब कोरे ...

तात्यासाहेब कोरे यांनी दूरदृष्टी, अथक परिश्रम आणि सामान्यांविषयीच्या कळवळ्यातून वारणानगरचे सहकार शिल्प उभारले. आमदार विनय कोरे यांनी ते सर्व स्पर्शी करण्याचा निर्णय घेतला. याचाच एक भाग म्हणून गेल्या पाच वर्षात या ठिकाणी विज्ञानाचा जागर सुरू आहे. प्रशासकीय अधिकारी वासंती रासम यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य समन्वयक फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. जॉन डिसोझा हे या प्रकल्पांची जबाबदारी सांभाळत आहेत. प्रीतेश लोले, पोपट कुंभार, ऐश्वर्या मिठारी, किमया पोवार हे वैज्ञानिक अधिकारी म्हणून येथे काम करतात.

वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या माध्यमातून शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील २७ हजार ५०० विद्यार्थ्यांना येथे आणून वैज्ञानिक प्रयोग करून घेतले जातील. तारांगणासह सर्व सहकारी संस्था दाखविल्या जातील. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा हेच आमचे उद्दिष्ट आहे.  - आमदार विनय कोरे-अध्यक्ष, वारणा संस्था समूह

टॅग्स :kolhapurकोल्हापूर