कोल्हापूर : विश्वचषक क्रिकेट स्पर्धा अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र, सबकुछ क्रिकेट समजल्या जाणाऱ्या देशात अजूनही ‘क्रिकेटचा फिव्हर’ जाणवेनाच झाला आहे. कोल्हापूरही त्याला अपवाद नाही. गतवेळेचा विश्वविजेत्या असणाऱ्या भारतीय संघाच्या समर्थनात कोठेही चिअरअप करण्यासाठी ना पोस्टरबाजी, ना रॅली काढण्यात आली आहे. याशिवाय जाहिरातींमधूनही भारतीय क्रिकेटपटूंना मोठे स्थान दिल्याचे जाणवत नाही. गतवेळी भारतरत्न सचिन तेंडुलकर शेवटचा विश्वचषक खेळणार होता म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय संघ कोण-कोणत्या संघांना हरवून अंतिम फेरी गाठतो की अन्य स्थानावरच राहतो याकडे क्रीडारसिकांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, यंदा असा हुकमी एक्का भारतीय संघात नसल्याने व टष्ट्वेंटी-२०सारख्या स्पर्धांमुळे क्रिकेटचा फिव्हर यंदाच्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान कुठेही दिसत नाही. जखमी खेळाडूंना घेऊन यंदाची विश्वचषक स्पर्धा आपला संघ खेळणार आहे. यासह अन्य कारणांमुळे यंदा विश्वचषक क्रिकेटचा फिव्हर दिसेनासा झाला आहे.- बाळू पसारे,माजी क्रिकेटपटू बाऊन्सी खेळपट्टीमुळे भारतीय फलंदाजी न्यूझीलंड, आॅस्ट्रेलियात चालणे कठीण आहे. याशिवाय नवोदित संघाची कामगिरी गेल्या तीन महिन्यांत सर्वांनाच दिसली आहे. अतिक्रिकेट आणि टीव्हीवरील अतिदर्शनही विश्वचषकाचा फिव्हर कमी करण्यास कारणीभूत आहे.रमेश कदम, माजी रणजीपटूअलिकडील मालिकेतील कामगिरीमुळे चाहत्यांचा संघावरील विश्वास उडाला आहे. त्यात सचिन तेंडुलकर खेळत नसल्यामुळे काहींनी पाठ फिरविली आहे. पण जस जसी स्पर्धा पुढे सरकेल तसे आकर्षण वाढेल. - सुधर्म वाझे,माजी क्रिकेटपटूभारतीय क्रिकेटपटूंना मिळणाऱ्या सुविधा आणि टीव्हीच्या ग्लॅमरमुळे क्रिकेटपटूंचे किंवा एकूणच क्रिकेटमधील नावीन्य कमी झाले आहे. याशिवाय यंदा सचिन संघात नाही. त्यामुळे यंदा वर्ल्ड कपचा फिव्हर दिसेनासा झाला आहे.- नंदकुमार बामणे, माजी क्रिकेटपटू
‘वर्ल्डकप’चा फिव्हर काही केल्या चढेनाच !
By admin | Published: February 10, 2015 12:35 AM