शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

मूलद्रव्यांची दुनिया विविध भाषांत अनुवादित व्हावे :डी. टी. शिर्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2021 10:42 AM

Shivaji University Kolhapur- आवर्तसारणी व मूलद्रव्यांची दुनिया या पुस्तकाचा अनुवाद विविध प्रादेशिक भाषांत व्हावा. त्याद्वारे सर्वच भाषांतील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देमूलद्रव्यांची दुनिया विविध भाषांत अनुवादित व्हावे :डी. टी. शिर्के शिवाजी विद्यापीठात व्ही. एन. शिंदे यांचा सत्कार

 कोल्हापूर : आवर्तसारणी व मूलद्रव्यांची दुनिया या पुस्तकाचा अनुवाद विविध प्रादेशिक भाषांत व्हावा. त्याद्वारे सर्वच भाषांतील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केली.शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या ह्यआवर्तसारणी व मूलद्रव्यांची दुनियाह्ण या पुस्तकाला शासनाचा सन २०१९साठी उत्कृष्ट विज्ञानग्रंथ म्हणून महात्मा जोतीराव फुले पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्त डॉ. शिंदे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. एका लेखापासून सुरू झालेला प्रवास केवळ विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेपोटी आवर्तसारणी व मूलद्रव्यांची दुनिया या पुस्तकापर्यंत येऊन ठेपला.

या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा महात्मा फुले यांच्या नावे देण्यात येणारा पुरस्कार लाभला, ही बाब माझ्यासाठी अत्यंत समाधान, जबाबदारीची जाणीव करून देणारी असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, ग्रंथ, विद्यापीठाचे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन डॉ. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, गजानन पळसे, नमिता खोत, आलोक जत्राटकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, ज्येष्ठ कवी संजय कृष्णाजी पाटील, डॉ. रणधीर शिंदे, भारती पाटील, आदी उपस्थित होते.विज्ञानाची गोडी निर्माणविज्ञान लेखन करताना त्यामधील वस्तुनिष्ठतेला कोणताही धक्का न लावता अत्यंत ओघवत्या, गोष्टीरूप पद्धतीने समजावून सांगण्याची शैली डॉ. शिंदे यांना साधली आहे. शिक्षक, विद्यार्थी, पालकांसह सर्वसामान्य वाचकालाही हा विषय रुक्ष वाटणार नाही, तर विज्ञानाची गोडीच निर्माण होईल, असा त्यांनी मांडला असल्याचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले.

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठliteratureसाहित्यkolhapurकोल्हापूर