शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या ‘आवर्तसारणी व मूलद्रव्यांची दुनिया’ या पुस्तकाला शासनाचा सन २०१९साठी उत्कृष्ट विज्ञानग्रंथ म्हणून महात्मा जोतीराव फुले पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्त डॉ. शिंदे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. एका लेखापासून सुरू झालेला प्रवास केवळ विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेपोटी ‘आवर्तसारणी व मूलद्रव्यांची दुनिया’ या पुस्तकापर्यंत येऊन ठेपला. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा महात्मा फुले यांच्या नावे देण्यात येणारा पुरस्कार लाभला, ही बाब माझ्यासाठी अत्यंत समाधान, जबाबदारीची जाणीव करून देणारी असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.
यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, ग्रंथ, विद्यापीठाचे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन डॉ. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, गजानन पळसे, नमिता खोत, आलोक जत्राटकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, ज्येष्ठ कवी संजय कृष्णाजी पाटील, डॉ. रणधीर शिंदे, भारती पाटील, आदी उपस्थित होते.
चौकट
विज्ञानाची गोडी निर्माण
विज्ञान लेखन करताना त्यामधील वस्तुनिष्ठतेला कोणताही धक्का न लावता अत्यंत ओघवत्या, गोष्टीरूप पद्धतीने समजावून सांगण्याची शैली डॉ. शिंदे यांना साधली आहे. शिक्षक, विद्यार्थी, पालकांसह सर्वसामान्य वाचकालाही हा विषय रुक्ष वाटणार नाही, तर विज्ञानाची गोडीच निर्माण होईल, असा त्यांनी मांडला असल्याचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले.
फोटो (३१०१२०२१-कोल-व्ही एन शिंदे (सत्कार) : शिवाजी विद्यापीठात शनिवारी शासनाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉ. व्ही. एन. शिंदे यांचा कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डावीकडून पी. एस. पाटील, विलास नांदवडेकर, व्ही. टी. पाटील, गजानन पळसे उपस्थित होते.