शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

कोल्हापूरमधील केआयटी महाविद्यालयात मंगळवारी ‘ए वर्ल्ड इन मोशन’ स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 6:44 PM

कोल्हापूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग (केआयटी) मधील मेकॅनिकल विभागाच्या ‘सोसायटी आॅफ आॅटोमोटिव्ह इंजिनिअर्स’ या चॅप्टरअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी (दि. १९) ‘ए वर्ल्ड इन मोशन’ (ए.डब्ल्यू.आय.एम.) ही अभिनव स्पर्धा होणार आहे, अशी माहिती या स्पर्धेचे प्रादेशिक निमंत्रक सुभाष माने व विद्यार्थी समन्वयक ओझेर हुदली यांनी बुधवारी दिली.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांचा सहभागभौतिकशास्त्राच्या प्रतिकृतींवर आधारित उपक्रममेकॅनिकल विभागाच्या ‘सोसायटी आॅफ आॅटोमोटिव्ह इंजिनिअर्स’ चॅप्टरअंतर्गत अभिनव स्पर्धा

 कोल्हापूर : कोल्हापूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग (केआयटी) मधील मेकॅनिकल विभागाच्या ‘सोसायटी आॅफ आॅटोमोटिव्ह इंजिनिअर्स’ या चॅप्टरअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी (दि. १९) ‘ए वर्ल्ड इन मोशन’ (ए.डब्ल्यू.आय.एम.) ही अभिनव स्पर्धा होणार आहे, अशी माहिती या स्पर्धेचे प्रादेशिक निमंत्रक सुभाष माने व विद्यार्थी समन्वयक ओझेर हुदली यांनी बुधवारी दिली. 

शालेय विद्यार्थ्यांना मूलभूत अभियांत्रिकी कौशल्याची माहिती देणे, तरुण वयात इंजिनिअरिंगच्या आॅटोमोटिव्ह अ‍ॅप्लिकेशनच्या दिशेने झुकण्याचा दृष्टिकोन राखण्यासाठी ‘ए वर्ल्ड इन मोशन’ ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थी भौतिकशास्त्राच्या मूलभूत नियमांवर आधारित प्रतिकृती (मॉडेल) बनवतील, त्याचे सादरीकरण करतील.

या स्पर्धेपूर्वी ‘केआयटी’च्या विदयार्थी स्वयंसेवकांनी शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धेची माहिती सांगून त्यांना प्रशिक्षण दिले आहे. प्रा. सुभाष माने, अमोल पाटील यांनी स्पर्धेच्या तांत्रिक बाबींचे महत्त्व सांगितले. या स्पर्धेसाठी प्रा. सौरभ पाटील, अक्षय दशवंत हे समन्वयक, तर ओझेर हुदली हे विदयार्थी समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.

विद्यार्थी समन्वयक हुदली आणि चिंतन जोशी, पुष्कराज कुलकर्णी , अनीश घाटगे, ऋषिकेश माळी, अभिषेक चव्हाण, श्रेयस कुलकर्णी , संकेत कोडोलीकर, करण पारेख, श्रेयस शहा, सौरभ कालेकर, अजिंक्य जाधव, दुष्यंत गोवर्धन, वैष्णवी मोकाशी, मयूरी साने यांनी शालेय स्तरावरील प्रशिक्षण आणि स्पर्धा घेतली. त्यांना ‘केआयटी’चे अध्यक्ष सचिन मेनन, उपाध्यक्ष भरत पाटील, सचिव साजिद हुदली, संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी यांचे मार्गदर्शन लाभले.

दहा शाळांचा सहभागन्यू मॉडेल इंग्लिश स्कूल, संजय घोडावत, डे बोर्डिंग स्कूल, निवासी शाळा, सीआयई स्कूल, ओरिएंटल इंग्लिश मीडियम स्कूल, विद्यामंदिर हिरवडे खालसा, सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूल, सिद्धेश्वर विद्यालय, कुर्ली; विद्यामंदिर नंदगाव, श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल (कागल) या शाळांतील एकूण ९०९ विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाल्या आहेत.

नऊ वर्षांपूर्वी स्पर्धेची सुरुवातसोसायटी आॅफ आॅटोमोटिव्ह इंजिनिअर्सच्या ए.डब्ल्यू.आय.एम. या स्पर्धेची संकल्पना अमेरिकेमध्ये सुरू झाली. यानंतर भारतामध्ये हा कार्यक्रम राबविला जात आहे. एडब्ल्यूआयएम प्रथम सन २००८ मध्ये राष्ट्रीय स्तरावर सुमारे ६० विद्यार्थ्यांसह सुरू झाले. आता त्याची व्याप्ती वाढली आहे.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollegeमहाविद्यालय