शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू, प्र-कुलगुरूंसह ४७ संशोधकांना जागतिक मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2021 6:27 PM

: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी.टी.शिर्के, प्रकुलगुरु डॉ. पी.एस.पाटील यांच्यासह ४७ संशोधकांना जागतिक मानांकन मिळाले आहे. वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२१मध्ये एवढ्या मोठ्याप्रमाणावर यश मिळण्याची ही पहिलीच घटना ठरल्याने नॅक अ  पाठोपाठ विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला आहे.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू, प्र-कुलगुरू यांचा समावेश ४७ संशोधकांना जागतिक मानांकन

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी.टी.शिर्के, प्रकुलगुरु डॉ. पी.एस.पाटील यांच्यासह ४७ संशोधकांना जागतिक मानांकन मिळाले आहे. वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२१मध्ये एवढ्या मोठ्याप्रमाणावर यश मिळण्याची ही पहिलीच घटना ठरल्याने नॅक अ  पाठोपाठ विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला आहे.अमेरिकेच्या मिशीगन विद्यापीठातील प्रा. मूरत आल्पर आणि प्रा. सिहान डॉजर या दोघांनी संयुक्तपणे आल्पर-डॉजर सायंटिफीक इंडेक्स तथा ए.डी. सायंटिफिक इंडेक्स विश्लेषित केलेला आहे. जगभरातील १८१ देशांतील १०,६५५ विद्यापीठांतील ५,६५,५५३ संशोधकांचा डाटा त्यांनी संकलित केला.

कृषी व वने, कला व स्थापत्य, वाणिज्य व व्यवस्थापन, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, इतिहास, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, कायदे अभ्यास, वैद्यकीय व आरोग्य विज्ञान, नैसर्गिक शास्त्रे व सामाजिक शास्त्रे यांसह अन्य २५६ उपशाखांमधील संशोधकांचा समावेशही या मानांकनामध्ये करण्यात आला आहे. त्यातून वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंग-२०२१ जाहीर करण्यात आले आहे.अत्यंत व्यापक स्तरावर घेण्यात आलेल्या या क्रमवारीमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या ४७ संशोधकांनी स्थान पटकावले आहे. या संशोधकांत स्थान मिळवणारे कुलगुरू डॉ. शिर्के हे संख्याशास्त्र विषयातील एकमेव संशोधक ठरले असून प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांना मटेरियल सायन्स व नॅनोविज्ञान व तंत्रज्ञानातील संशोधनासाठी क्रमवारीत आघाडीचे स्थान मिळाले आहे.

रसायनशास्त्राचे ११, पदार्थविज्ञान व मटेरियल सायन्सचे ९, वनस्पतीशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवरसायनशास्त्र, नॅनो विज्ञान व तंत्रज्ञान, इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स या विषयांचे प्रत्येकी ३, प्राणीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, धातूविज्ञान, अन्नविज्ञान या विषयांचे प्रत्येकी २ आणि गणित, फार्मसी व संगणकशास्त्राचे प्रत्येकी १ असे एकूण ४७ आजी-माजी संशोधक समाविष्ट आहेत.

शिवाजी विद्यापीठामध्ये विविध विषयांत सुरू असलेल्या अखंडित संशोधनाचे हे फलित आहे. यापूर्वीही स्टॅनफोर्ड विद्यापीठाने स्कोपस डाटाच्या आधारे जगातल्या आघाडीच्या २ टक्के संशोधकांची यादी जाहीर केली होती, त्यामध्येही आमच्या संशोधकांचा समावेश होता. त्या कार्याला ए.डी. सायंटिफिक इंडेक्समुळे पुष्टी लाभली आहे. यात प्रत्येक संशोधक, शिक्षक, विद्यार्थी अभिनंदनास पात्र आहे. हा वारसा आणि जागतिक संशोधन क्रमवारीतील हे स्थान वृद्धिंगत होण्याच्या दिशेने विद्यापीठातील समस्त संशोधक कार्यरत राहतील.- डॉ. डी.टी.शिर्के,कुलगुरु, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

संशोधक पुढीलप्रमाणे-

  • संख्याशास्त्र- डॉ. डी.टी. शिर्के
  • पदार्थविज्ञान, मटेरियल सायन्स व धातूविज्ञान- डॉ. पी.एस. पाटील, डॉ. के. वाय. राजपुरे, डॉ. सी.एच. भोसले, डॉ. आण्णासाहेब मोहोळकर, डॉ. एन. आय. तरवाळ, डॉ. राजेंद्र सोनकवडे, डॉ. टी.जे. शिंदे, डॉ. मानसिंग टाकळे, डॉ. ए.बी. गडकरी, डॉ. विजया पुरी, डॉ. सोनल चोंदे

 

  • रसायनशास्त्र- डॉ. के.एम. गरडकर, डॉ. एस.एस. कोळेकर, डॉ. ए.व्ही. घुले, डॉ. एस.डी. डेळेकर, डॉ. जी.बी. कोळेकर, डॉ. डी.एम. पोरे, डॉ. राजश्री साळुंखे, डॉ. एम.बी. देशमुख, डॉ. डी.एच. दगडे, डॉ. गजानन राशीनकर, डॉ. अनंत दोड्डमणी
  • वनस्पतीशास्त्र- डॉ. एन. बी. गायकवाड, डॉ. एन.एस. चव्हाण, डॉ. डी.के. गायकवाड

 

  • जैवतंत्रज्ञान व बायोरिमेडिएशन- डॉ. एस.पी. गोविंदवार, डॉ. ज्योती जाधव, डॉ. नीरज राणे- जैवतंत्रज्ञान अधिविभागातील संशोधक विद्यार्थी

प्राणीशास्त्र- डॉ. एम.व्ही. शांताकुमार, डॉ. टी.व्ही. साठे

  • जैवरसायनशास्त्र-डॉ. के.डी. सोनवणे, डॉ. पंकज पवार, डॉ. पी.बी. दंडगे

 

  • इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स - डॉ. पी.एन. वासंबेकर , डॉ. टी.डी. डोंगळे, डॉ. आर.आर. मुधोळकर
  • नॅनोसायन्स व तंत्रज्ञान- डॉ. एस.बी. सादळे, डॉ. एन.आर. प्रसाद, डॉ. किरण कुमार शर्मा
  • पर्यावरणशास्त्र- डॉ. पी.डी. राऊत , डॉ. विजय कोरे
  • अन्नविज्ञान व अभियांत्रिकी-डॉ. ए.के. साहू, डॉ. राहुल रणवीर
  • संगणकशास्त्र- डॉ. एस.आर. सावंत
  • गणितशास्त्र- डॉ. के.डी. कुचे
  • फार्मसी- डॉ. जॉन डिसुझा (तात्यासाहेब कोरे फार्मसी महाविद्यालय, वारणानगर) 
टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठscienceविज्ञानkolhapurकोल्हापूर