कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवात पाचव्या माळेला बुधवारी देवीची अंबारीतील रुपात पूजा बांधण्यात आली. यादिवशी देवी लव्याजम्यानिशी आपली सखी त्र्यंबोली देवीला भेटायला अंबारीतून जाते ही या पूजेमागील कथा आहे.माक्ष नावाच्या दैत्याने अंबाबाईसह सर्व देवतांना शेळी मेंढ्या मध्ये रूपांतरित केले होते. त्यावेळी त्र्यंबोलीदेवीने कामाक्षाचा योगदंड हिरावून घेऊन वध केला होता. त्यानंतर अंबाबाईने आपल्या मूळ रूपात येऊन कोल्हासुराचा वध केला.
विजयोत्सव साजरा करताना त्र्यंबोलीला बोलवायचे राहून गेले हे लक्षात आल्यानंतर अंबाबाई लवाजम्यासह त्र्यंबोलीच्या टेकडीवर गेली. तिची भेट घेवून वर दिला की कुष्माण्ड भेदनाचा जो सोहळा मी मुक्ती मंडपात करते तो आज पासून तुझ्या दारात होईल मी दरवर्षी तुझ्या भेटीला येऊन हा सोहळा पार पाडेन. त्यानुसार देवीची गजारूढ म्हणजे हत्तीवर बसलेल्या रुपात पूजा बांधली जाते. ही पूजा माधव मुनीश्वर व मकरंद मुनीश्वर यांनी केली.