शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
2
"अशा घोषणा लोकांना आवडणार नाहीत"; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध
3
"काही मशिनमध्ये गडबड होण्याची शक्यता! असं परदेशी माणूस म्हणतोय"; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
4
महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
5
'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्रावर दरोडा टाकला', सीएम एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका
6
“कुणी मूर्खासारखे काही बोलले तर त्याची नोंद का घ्यायची?”; शरद पवारांचा राज ठाकरेंवर पलटवार
7
"ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला काही बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले"; नारायण राणे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देणार?
8
राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
9
“महायुतीविरोधात तीव्र संताप, १७५ जागांसह मविआचे सरकार येणार”; नाना पटोलेंचा मोठा दावा
10
"विराटचं काहीतरी बिनसलंय, संघात असूनही तो रोहित अन् गंभीरशी..."; माजी क्रिकेटपटूचा दावा
11
Exclusive: "आम्ही दोघी समोरासमोर उभं राहून...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकासोबत काम करण्याचा अनुभव
12
परीक्षार्थींच्या आंदोलनासमोर युपीपीएससी नमली; एकाच दिवशी, एकाच शिफ्टमध्ये परीक्षा होणार
13
पुन्हा बॅगा तपासल्या! तिसऱ्यांदा तपासणीवर उद्धव ठाकरेंचा रोखठोक प्रश्न; अधिकारी म्हणाले...
14
‘बांगलादेशात ९० टक्के मुस्लिम, सेक्युलर शब्दाची आवश्यकता नाही’, मोहम्मद युनूस सरकार मोठा निर्णय घेणार? 
15
'RBI ने व्याजदर कमी करावेत' गोयल यांच्या मागणीवर गव्हर्नर दास यांचं एका वाक्यात उत्तर
16
कर्नाटकात भाजप ‘ऑपरेशन लोटस’ चालवत आहे; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनंतर शिवकुमारांचा दावा
17
जरी मला मुख्यमंत्री केले तरी मी होणार नाही; 'महाराष्ट्राचा सीएम कोण'वर असे का बोलले नितीन गडकरी?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'१५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसुल करणार'; भाजपा महिला नेत्याचं वादग्रस्त विधान
19
Ranji Trophy : एका डावात दोघांची ट्रिपल सेंच्युरी; डाव घोषित केल्यामुळं हुकली वर्ल्ड रेकॉर्डची संधी
20
महाराष्ट्राच्या रणांगणात ४० लाख उत्तर भारतीय मतदार; मुंबईत २२ जागांवर निर्णायक मते

‘लक्ष्मी-कुबेर’चे पूजन उत्साहात

By admin | Published: October 31, 2016 12:05 AM

आतषबाजीने उजळला आसमंत : अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी; आज पाडवा

कोल्हापूर : असंख्य दीप आणि रोषणाईचा झगमगाट, रांगोळीची सजावट, आंब्याची पाने, झेंडूच्या फुलांच्या माळा, कलशावर लक्ष्मीची, तसेच धनाचा अधिपती कुबेराच्या प्रतिमेची स्थापना, मंत्रोच्चार, आरती, धूप-दीप आणि सायंकाळच्या अमृतवेळी मांगल्य आणि भक्तिभावाच्या सुगंधी वातावरणात घराघरांत, कार्यालयांत, तसेच उद्योग-व्यवसायांच्या ठिकाणी वैभव, सुख, समृद्धी आणि भरभराटीचे दान देणाऱ्या लक्ष्मी-कुबेराची रविवारी पारंपरिक थाटात सर्वांनीच मनोभावे पूजा केली. दरम्यान, करवीरनिवासिनी अंबाबाईची धनलक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली होती. देवीच्या दर्शनासाठी स्थानिक भक्तांसह परराज्यांतील भाविकांनीही रविवारी पहाटेपासून गर्दी केली होती. लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त रविवारी सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटे ते रात्री आठ वाजून ४५ मिनिटे या वेळेत होता. लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या साहित्यखरेदीसाठी नागरिकांची दुपारपर्यंत बाजारपेठेत लगबग सुरू होती. लक्ष्मीच्या मनोभावे स्वागतकार्यात घराघरांतील सुवासिनी महिला दुपारी चार वाजल्यापासून व्यस्त होत्या. लक्ष्मीच्या स्वागतासाठी त्यांनी आपल्या दारांत मोठमोठ्या, विविधरंगी रांगोळ्या काढल्या. सायंकाळी सहाच्या सुमारास घराघरांमध्ये लक्ष्मीपूजनाची धांदल उडाली. घरात चौरंगावर लक्ष्मी-कुबेराची प्रतिमा, समोर कलश मांडण्यात आला. धान्याच्या राशीवर लक्ष्मीची मूर्ती, तर चौरंगावर शेजारी एका बाजूला सुपारीरूपी गणपती, दुसऱ्या बाजूला सरस्वतीचे प्रतीक असलेली लेखणी पूजनासाठी ठेवली होती. यावेळी अनेकांनी मेसेज, व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकच्या माध्यमातून लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा दिल्या. व्यापारी, सराफ पेढ्यांवर उत्साहाने पूजा कार्यालये, व्यावसायिक, दुकानदारांनीही सायंकाळी व रात्री लक्ष्मीपूजन केले. सोने-चांदीचा व्यवसाय करणाऱ्या सराफांच्या पेढ्यांवर अधिक धार्मिक विधींनी ही पूजा करण्यात आली. झेंडूच्या फुलांच्या माळा, विद्युतमाळा, पणत्या लावून दुकाने सजविण्यात आली होती. काही दुकानांमध्ये एका बाजूला लक्ष्मीपूजन आणि दुसऱ्या बाजूला ग्राहकसेवा असे चित्र होते. दुकानांमध्ये वर्षातून एकदा होणाऱ्या या खास पूजनाला सर्व कुटुंबीयांनी उपस्थिती लावली होती. आज पाडवा पाडव्याच्या खरेदीसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. ग्राहकांची अधिकाधिक गर्दी खेचण्यासाठी विविध वस्तूंच्या खरेदीवर सवलत आणि बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. सोन्या-चांदीसह, चारचाकी, दुचाकी वाहनखरेदीकडे कल असतो. महाद्वार रोड, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी असा व्यापारी भाग पाडव्यासाठी सज्ज झाला आहे. वहीपूजन झाल्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीत पाडवा साजरा करण्याची परंपरा आहे.