शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहात पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
4
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
6
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
7
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
8
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
9
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
10
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
11
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
12
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
13
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
14
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
15
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
16
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
17
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
18
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
19
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
20
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?

Navratri 2023: सातव्या माळेला कोल्हापूरच्या अंबाबाईचा ‘नारायणी नमोस्तुते’ रूपात जयघोष, उद्या नगरप्रदक्षिणा

By इंदुमती सूर्यवंशी | Published: October 21, 2023 4:12 PM

कोल्हापूर : शारदीय नवरात्र उत्सवाच्या सातव्या माळेला शनिवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची ‘नारायणी नमोस्तुते’ या रूपामध्ये पूजा बांधण्यात आली. उद्या ...

कोल्हापूर : शारदीय नवरात्र उत्सवाच्या सातव्या माळेला शनिवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची ‘नारायणी नमोस्तुते’ या रूपामध्ये पूजा बांधण्यात आली. उद्या रविवारी (दि. २२) अष्टमीनिमित्त रात्री साडेनऊ वाजता अंबाबाईची नगरप्रदक्षिणा होणार आहे.सर्व चराचर सृष्टी श्रीदेवी मातेच्या दिव्य तेजांशातून निर्माण झाली. अखिल ब्रह्मांडात मीच एकटी नित्य विद्यमान आहे. माझ्या व्यतिरिक्त इथे कोण आहे, असे श्रीदेवीमाता म्हणते. यामुळे शुंभ-निशुंभ युद्धावेळी ब्रह्मादी देवतांची शक्तिस्वरूपे, श्रीदेवीमातेच्या साथीने, युद्धात असुरांशी लढण्यासाठी उतरल्या. देवीने शुंभ-निशुंभांचा वध केला व त्रैलोक्याला दुःख मुक्त केले.श्रीदेवी महात्म्याचा (सप्तशती) अकरावा अध्याय ‘नारायणी स्तुती’ या नावाने ओळखला जातो. या अध्यायात श्रीदेवीची स्तुती करताना म्हणले आहे की, हे माते! हे सर्व विश्व तू एकटीनेच व्यापलेले आहेस. याच अध्यायात ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, ऐंद्री, चामुंडा या रूपात असणाऱ्या हे नारायणी! तुला नमस्कार असो, असे देवीचे स्तवन केले आहे.विश्वातील वेगवेगळ्या शक्ती ही एका आदिशक्तीचीच विविध रूपे आहेत, हे दर्शवणारी सप्तमातृकाशक्ती श्रीदेवीमातेची ही महापूजा श्रीपूजक आशुतोष ठाणेकर, प्रसाद लाटकर, श्रीनिवास जोशी यांनी साकारलेली आहे. रविवारी अष्टमीनिमित्त रात्री साडेनऊ वाजता अंबाबाईची सजवलेल्या वाहनातून नगरप्रदक्षिणा निघणार आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNavratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर