गांधीनगर : वाढत्या महागाईच्या निषेधार्थ रिक्षा, स्कुटर, गॅस सिलिंडर, खाद्यतेलाचा डबा, तूरडळीची बरणी या वस्तूंना हार अर्पण करून करवीर शिवसेनेच्यावतीने गांधीनगरात अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली. पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये जीवघेणी वाढ झाल्याने उद्योग व्यवसाय, कर्मचारी, व्यापारी वर्ग, उद्योजक, वाहतूक संघटना मोठ्या संकटात सापडले आहेत. पेट्रोल-डिझेल दरात एवढी प्रचंड दरवाढ होऊनही केंद्र शासन मूग गिळून गप्प आहे. भांडवलदारांना पाठीशी घालण्याचा उद्योग केंद्र शासनाने चालविला असल्याचा आरोप शिवसेना तालुकाप्रमुख राजू यादव यांनी केला. यावेळी शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, वीरेंद्र भोपळे, शिवानंद स्वामी, दिलीप सावंत, सचिन नागटीळक, बाळासाहेब नलवडे, दीपक पोपटानी, शिवाजी लोहार, खेताजी राठोड, नितेश भाटीया, रमेश सोळंकी, ओंकार जोशी, बाबूराव पाटील, योगेश लोहार, वीरेंद्र भोपळे, दीपक पोपटाणी(अंकल), सुनील पारपाणी, सूरज जाधव, कुंडलिक गोते, आदी उपस्थित होते.
फोटो : २४ गांधीनगर आंदोलन
पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात करवीर शिवसेनेच्यावतीने गांधीनगरमध्ये निदर्शने करण्यात आली.