शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
2
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
3
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
5
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
7
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
8
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
9
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
10
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
11
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
12
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
13
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
14
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
15
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
16
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
17
दो भाई दोनों तबाही! शिखर धवन आणि युझवेंद्र चहलची भन्नाट कॉमेडी; चाहत्यांना हसू आवरेना
18
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
19
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
20
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत

सहा दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी, कुस्तीपटू निलेश कंदूरकरचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2018 8:10 AM

मानेवर पडून गंभीर जखमी झालेला मल्ल निलेश विठ्ठल कंदूरकर याचं निधन झालं आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरचा आखाडा उमद्या मल्लाला पोरका शेकडो कुस्तीप्रेमींनी केली कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात गर्दी

कोल्हापूर/कऱ्हाड - कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील बांदिवडे येथे कुस्ती खेळताना मानेवर पडून गंभीर जखमी झालेला मल्ल निलेश विठ्ठल कंदूरकर याचं निधन झालं आहे. निलेशवर कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पण निलेशची मृत्यूशी झुंज संपली असून शुक्रवारी पहाटे 4 वाजता निलेशचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 

आखाड्यात घाम गाळणारा मल्ल नीलेश कुस्ती खेळताना अपघातानं जायबंदी झाला. ज्या खेळात नाव कमवायचं, त्याच खेळात त्याने जीव गमावला. त्याच्या या अकाली जाण्यानं कोल्हापूरचा आखाडा उमद्या मल्लाला पोरका झालाय. तर सातारा, सांगली अन् कोल्हापूरच्या लाल मातीचाही हुंदका दाटलाय. येथील कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी गावचा पैलवान नीलेश कुरूंदकरने शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. गेले सहा दिवस त्याची मृत्यूशी झुंज सुरू होती. त्याच्या मृत्यूची वार्ता सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत वाऱ्यासारखी पसरली आणि शेकडो कुस्तीप्रेमींनी कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात गर्दी केली.कोल्हापूर जिल्ह्यातील बांदिवडे येथे जोतिबा यात्रेच्या कुस्ती मैदानात मंगळवारी कुस्ती खेळताना वीस वर्षांचा पैलवान नीलेश कुरूंदकरला दुखापत झाली. निपचित पडलेल्या या पैलवानाला कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. येथील तज्ज्ञ डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते.

कृष्णा उद्योग समूहाचे डॉ. अतुल भोसले यांनीही सर्वतोपरी उपचार करण्याच्या सूचना तज्ज्ञ डॉक्टरांना दिल्या होत्या. गुरुवारी मणक्याला झालेली दुखापत बरी करण्यासाठी त्याला वजनही लावण्यात आले होते. तर रक्तदाब स्थिर होण्यासाठीही शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता त्याची प्राणज्योत मावळली आणि कुरूंदकर परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. 

अवघ्या १९ वर्षांच्या नीलेशचे कुस्तीवर अपार प्रेम होतं. त्यामुळे माजी कुस्तीगीर असलेले वडील विठ्ठल कंदूरकर यांनी त्याला वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे कुस्ती संकुलात कुस्तीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी घातलं. भारदस्त शरीरयष्टीचा असलेला निलेश मनमिळावू व नम्र स्वभावाचा ओळखला जायचा.  

बांदिवडे येथे एका मैदानात प्रतिस्पर्धी मल्लाने एकचाक डाव टाकताना नीलेश मानेवर पडला. त्यात त्याच्या मणक्यांना जबर मार लागला. त्यामुळे नीलेशच्या शरीराची हालचाल पूर्णपणे मंदावली. त्याला शाहूपुरी येथील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. 

मणक्याला दुखापत झाल्यामुळे त्याचे आॅपरेशन करणे गरजेचे होते. मात्र, नीलेशचा  रक्तदाब स्थिर नसल्याने शस्त्रक्रिया करता येत नव्हती. त्यासाठी इंजेक्शन व गोळ्याच्या माध्यमातून रक्तदाब स्थिर राहण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यामध्ये यश आले नाही आणि शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच नीलेशचा मृत्यू झाला. - डॉ. प्रसन्न पाटणकरन्युरोसर्जन, कृष्णा हॉस्पिटल