शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

गावोगावच्या यात्रा-जत्रांतून कुस्तीला लोकाश्रय

By admin | Published: April 24, 2017 11:40 PM

शाहूवाडी तालुका : एक रुपयापासून ते एक लाखापर्यंतच्या बक्षिसांची मैदाने

आर. एस. लाड -- आंबा --गावोगावच्या यात्रांची परंपरा कुस्ती खेळातील पैलवानकीचा बाज जपत आहे. कुस्तीच्या फडाभोवती त्या गावची संस्कृती, कुस्ती कलेची जाण, नव्या पिढीतील शरीर कमाईचा वारसा, कुस्तीला पाठबळ देणारी दानशूर मंडळी, अन् कुस्तीसाठी लोकाश्रय मिळवून देणारी संयोजकांची धडपड कुस्तीकलेची समृद्धी जपताना दिसते.यात्रा म्हटले की, ग्रामदेवतेचा जागर, करमणुकीचा मंच, स्नेहभोजनातील पाहुणचार अन् कुस्ती मैदान ही वैशिष्ट्ये घेऊन साजरी होणारी वार्षिक यात्रा गावची संस्कृती प्रतिबिंबित करते. एक रुपयापासून ते एक लाखापर्यंतच्या बक्षिसांच्या कुस्तीचे मैदान उमद्या मल्लांना व कुस्तीशौकिनांना आकर्षित करते. कोण दानशूर चांदीची गदा देणारी पंरपरा जपतो. तर एखादा समालोचक तालुकाभरची मैदाने कुस्तीच्या गाथेने स्फूर्तीदायक बनवितो. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या कुस्ती कलेला राजाश्रय मिळवून दिला. तो वारसा गावच्या यात्रा लोकाश्रयातून जपत आहेत. लोकसहभागाच्या पाठबळावर खेड्यापाड्यातील तरुण कुस्तीचा छंद आजा-पणजोबापासून जपत आहेत. कुस्तीगिरीबरोबर वस्तादगिरी अन् कुस्तीचे फड भरविणारे शिलेदार गावपांढरीचा कसदारपणा जपत आहेत. हजारो शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडण्यासाठी खेड्यापासून ते शहरापर्यंतचे मल्ल वर्षभर मातीची रग जपून, गावोगावच्या मानाच्या गदा खांद्यावर मिरविण्यास यात्रेकडे डोळे लावून बसतात. यात्रेचा हंगाम सुरू झाला की तालमीतील रात्र दिवसाचे बाळसे घेते अन् शड्डूचा महिमा घुमू लागतो. नाक्यावरील डिजिटलवरची महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानांची झुंज यासारखे मथळे फेट्यातील शेतकऱ्यांमध्ये पैलवानकीची ऊर्मी जागवते अन् हवेत पटका घुमवतच ‘वारे व्वा पट्ट्या’ची आरोळी देत मैदानाचा कोपरा अन् कोपरा फुलतो. चिमुकल्याची रुपयाची कुस्ती एकीकडे, तर हजारोंची कुस्ती पलीकडे रंगते. एकलंगी, धोबीपछाड, सुईदोरा हे डावपेच बहरतात. एक-एक करीत लाखाच्या कुस्तीचा सांज चढतो अन् हृदयाचा ठोका चुकविणारी चटकदार कुस्ती करणारा पैलवान गावच्या गळ्यातील ताईत बनून जातो. तर कधी बरोबरीत सोडविणारी नुरा कुस्तीशौकिनांचा भ्रमनिरासही करते.‘जगात भारी कोल्हापुरी’ म्हणत लाल मातीत पैलवानकीचा कस लावणारी मंडळी यात्रांच्या तारखा सांभाळणारे कॅलेंडर जपत घराणे, गाव अन् तालमीच्या नावाच्या गौरवात शिरपेच रोवणारी पैलवानगिरी मिरवितात. यात्रेतील मल्लांचा गौरव पाहून चिमुरडीही तालमीत घाम गाळत शड्डू ठोकताना दिसतात? पहाटे तालमीत शरीरयष्टी घडवायची अन् नदीत डुबकी मारून, वैरणीचा बोजा घेऊन घरी परतणारे चित्र आजही गावच्या वेशीवर दिसते. अख्खी हयात कुस्तीत घालविणारी ज्येष्ठ मंडळी उतारवयात तालमीच्या वस्तादपदी विराजमान होऊन, समाजाप्रती उत्तरदायित्व स्वीकारून, पुढील पिढी पैलवानकीकडे वळवत गावचे नाव उज्ज्वल करण्यास धडपडत आहेत. मातीतील कुस्तीकडून मॅटवरील कुस्तीकडे पाऊले पडत आहेत. शित्तूरचा कामगार केसरी समिंदर जाधव असो की जाकार्तावीर बंडा पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते वसंत पाटील असोत गावच्या मैदानावर हरियाना, पंजाबातील पैलवानांना अस्मान दाखवित कुस्ती छंद जपत आहेत. वारणेच्या काठावरील शित्तूर-वारुण, रेठरे, भेडसगाव, हारुगडेवाडी, शिवारे, वारणा कापशी, सरूड, सोनवडे, तर कडवी खोऱ्यातील पेरीड, कोपार्डे, परळे, कडवे, येलूर, शिरगाव, साळशी, पिशवी, बांबवडे या गावांतील मल्लांनी कुस्ती परंपरा अटकेपार नेली. यामध्ये बंडा पाटील, महिपती केसरे, दामाजी पाटील, दौलत पाटील, रंगराव कदम, बाजीराव केसरे, सुभाष सनगर, विजय बोरगे, शिवाजी पाटील, सचिन देसाई या मल्लांनी कुस्ती परंपरेचा लौकिक वाढविला. आॅलिम्पिक स्पर्धांमधील भारतीय मल्लांची कामगिरी ग्रामीण भागातील कुस्तीला अन् अडगळीतील तालमींना नवसंजीवनी देत आहे.