शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

परदेशी पाहुण्यांनी ‘खासबाग’मध्ये घेतले कुस्तीचे धडे

By admin | Published: April 15, 2017 1:04 AM

एझिया एक्स्प्रेस टीव्ही शो : साहसी खेळासाठी पुढे साताऱ्याला रवाना

 कोल्हापूर : बेल्जियममधील एका संस्थेच्या रिअ‍ॅलिटी गेम शो आणि माहितीपटाच्या निमित्ताने कोल्हापुरात दाखल झालेल्या परदेशी पर्यटक स्पर्धकांनी शुक्रवारी सकाळी भल्या पहाटे राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानाला भेट दिली. यावेळी त्यांनी कुस्तीचे धडे आणि प्रात्यक्षिकही केले. बेल्जियम येथील ‘एझिया एक्स्प्रेस’ या ट्रेझर हंट पद्धतीच्या साहसी टीव्ही गेम शोच्या मालिकेसाठी मूळचे पोलंडवासीय असलेले सहा स्पर्धक गेले दोन दिवस कोल्हापुरात आले आहेत. त्यांचा प्रवास श्रीलंकेतून सुरू झालेला आहे. ते भारतातील केरळ, तमिळनाडू, कर्नाटक असा प्रवास करीत कोल्हापुरात दाखल झाले होते. गुरुवारी (दि. १३) कोल्हापुरातील टाऊन हॉल, गंगावेश, रंकाळा, आदी भागांतून त्यांना चिठ्ठ्या टाकून पुढील ठिकाण सुचविले जात होते. त्यानुसार गेले दोन दिवस विविध ठिकाणी चिठ्ठी काढल्यानंतर ते ठिकाण मोबाईल ट्रॅकरद्वारे शोधून काढतात. यासाठी ते ‘गुगल मॅप’चा आधार घेतात. चिठ्ठीमध्ये असलेले ठिकाण त्यांना मिळाल्यानंतर ते पुढील स्थानासाठी मार्गस्थ होतात. शुक्रवारी ते कोल्हापूरहून साताऱ्याकडे रवाना झाले. तेथून पुढे अलिबाग व मुंबई या शहरांत ते साहसी खेळ व ठिकाण शोधणार आहेत. प्रवासाच्या निमित्ताने त्या-त्या प्रांतांतील सांस्कृतिक, नैसर्गिक, धार्मिक स्थानांचे दर्शन व्हावे, ते जगातील लोकांनाही शोच्या निमित्ताने पाहता यावे, या उद्देशाने कोल्हापुरात दाखल झालेले हे स्पर्धक शुक्रवारी पहाटे पाच वाजता राजर्षी शाहू कुस्ती मैदान येथे दाखल झाले. या ठिकाणी मोतीबाग तालीम येथील मल्लांनी या स्पर्धकांना कुस्तीची प्रात्यक्षिके दाखविली. सहापैकी दोन स्पर्धकांमध्ये कुस्तीही लावण्यात आली. कुस्ती प्रात्यक्षिकांनंतर या ठिकाणी पुन्हा पुढील ठिकाणाची चिठ्ठी काढण्यात आली. सात वाजता हा खेळ संपल्यानंतर ते पुढील फेरीसाठी जाधवगड, त्यानंतर पुणे, लोणावळा, अलिबागकडे रवाना झाले. या टीव्ही गेम शोसाठी चित्रपट व्यवस्था निर्मिती सहायक म्हणून मिलिंद अष्टेकर यांनी चित्रीकरणासाठी बेल्जियमच्या या कंपनीला साहाय्य केले. या गेम शोनिमित्त १४ चारचाकी गाड्यांचा ताफा गेले दोन दिवस कोल्हापुरात कार्यरत होता. बेल्जियम येथील ‘एझिया एक्स्प्रेस’हा ट्रेझर हंट पद्धतीचा साहसी टीव्ही गेम शोया खेळाच्या निमित्ताने मूळचे पोलंडवासीय असलेले सहा स्पर्धक गेले दोन दिवस कोल्हापुरात आले आहेत. ‘एझिया एक्स्प्रेस’ या साहसी टीव्ही गेम शोनिमित्त कोल्हापुरातील खासबाग मैदान येथे शुक्रवारी सकाळी आलेले परदेशी पर्यटक स्पर्धक खेळ संपल्यानंतर पुढील ठिकाणाच्या शोधात मार्गस्थ झाले.