शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
4
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
6
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
7
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
8
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
9
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
10
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
11
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
12
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
13
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
14
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
15
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
16
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
17
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
18
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
19
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
20
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...

लेखक सुरेशचंद्र गुप्ते यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 7:29 PM

artist, autharwriter, kolhpaurnews प्रतिभानगर येथील लेखक व कवी सुरेशचंद्र दत्तात्रय गुप्ते (वय ८८) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले विनय, नचिकेत, मुलगी संहिता, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

ठळक मुद्देलेखक सुरेशचंद्र गुप्ते यांचे निधन देहदानाचा संकल्प

कोल्हापूर : प्रतिभानगर येथील लेखक व कवी सुरेशचंद्र दत्तात्रय गुप्ते (वय ८८) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले विनय, नचिकेत, मुलगी संहिता, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.गुप्ते यांचे मूळ गाव कळमुंडी (ता. गुहागर). नोकरीनिमित्त ते कोल्हापूरमध्ये स्थायिक झाले. येथील मृद‌्संधारण विभागात पर्यवेक्षक पदावर ३८ वर्षे सेवा केल्यानंतर ते सन १९८९ मध्ये निवृत्त झाले. वाचन, लेखनाची आवड असल्याने त्यांनी शिवाजी विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयामधून एम. ए. आणि वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागामधून बीजेसी अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण केले.

पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून त्यांनी फिल्म ॲप्रिसिएशन अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले. त्यानंतर शिवाजी विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागामध्ये ते अतिथी प्राध्यापक म्हणून फिल्म जर्नालिझम हा विषय शिकवू लागले. त्यांनी सन १९९२ ते ९५ दरम्यान विद्यार्थ्यांना शिकविले.

गुप्ते यांना वृत्तपत्रांतील विविध विषयांवरील लेख, बातम्यांच्या कात्रणांचा संग्रह करण्याची आवड होती. त्यांनी देवदासी या मराठीतील पुस्तकाचे इंग्रजीमध्ये, तर व्हेनडेट्टा या इंग्रजी पुस्तकाचा मराठीमध्ये अनुवाद केला होता. त्यांनी विविध विषयांवर लेखन, कविता केल्या आहेत. त्यांनी देहदानाचा संकल्प केला होता. आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूरचे माजी अध्यक्ष विनय गुप्ते यांचे ते वडील होत. 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूर