शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

परीक्षार्थींच्या हातात चुकीची उत्तरपत्रिका

By admin | Published: April 17, 2017 1:05 AM

‘सेट’च्या परीक्षेतील प्रकार : काही काळ गोंधळ; ६६८० परीक्षार्थी

कोल्हापूर : चुकीची उत्तरपत्रिका मिळाल्याने महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेत (सेट) रविवारी विवेकानंद महाविद्यालयातील केंद्रावर काही विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. उत्तरपत्रिका वितरणातील चुकीमुळे हा गोंधळ निर्माण झाला. पर्यवेक्षक आणि परीक्षेच्या समन्वयकांनी काही विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका बदलून दिल्या, काहीजणांच्या उत्तरपत्रिकांवर स्वाक्षरी करून त्या अधिकृत केल्या. मात्र, यामध्ये विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे (यूजीसी) अधिव्याख्याता पदावर नियुक्त होण्यासाठी ‘सेट’ परीक्षा घेण्यात येते. कोल्हापुरातील सायबर, विवेकानंद महाविद्यालय, न्यू मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूल, शिवाजी विद्यापीठातील मानव्यशास्त्र इमारत, वि. स. खांडेकर भाषाभवन, रसायनशास्त्र विभाग, तंत्रज्ञान विभाग, पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, महावीर महाविद्यालय, शांतिनिकेतन स्कूल, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, एस. एम. लोहिया ज्युनिअर कॉलेज, राजर्षी शाहू महाराज ज्युनिअर कॉलेज, कॉमर्स कॉलेज,आदी केंद्रांवर रविवारी परीक्षा झाली. सकाळी दहा ते सव्वा अकरा या वेळेत पहिला, सव्वा अकरा ते दुपारी साडेबारामध्ये दुसरा आणि दुपारी दोन ते साडेचार या वेळेत तिसरा पेपर झाला. त्याचे स्वरूप वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असे होते. पहिल्या पेपरवेळी विवेकानंद महाविद्यालय केंद्रावर इंग्रजी विषयाच्या विद्यार्थ्यांना मॅथेमेटिकल सायन्स विषयाची (गणितशास्त्र), तर इंग्रजी विषयाची उत्तरपत्रिका (ओएमआर शीट) मॅथेमेटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या हातात पडली. चुकीची उत्तरपत्रिका हातात पडल्याचे पेपर सुरू झाल्यानंतर साधारणत: काही मिनिटांतच विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती पर्यवेक्षकांना दिली. या उत्तरपत्रिकांवर बैठक क्रमांक, विषयाचा सांकेतिक क्रमांक, स्वाक्षरीच्या नोंदी केल्या होत्या. संबंधित उत्तरपत्रिका संगणकीय प्रणालीद्वारे तपासल्या जात असल्याने विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका बदलून देण्याची मागणी केली. यावर काही विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका बदलून दिल्या. काहींच्या उत्तरपत्रिकांवर स्वाक्षरी करून त्या अधिकृत करण्यात आल्या. दरम्यान, संबंधित उत्तरपत्रिकांची तपासणी मॅन्युअल पद्धतीने करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी कोल्हापूर केंद्रामधून ८५३१ परीक्षार्थींनी नोंदणी केली होती.विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाहीया परीक्षेत या वर्षी मॅथेमेटिकल सायन्सची उत्तरपत्रिका स्वतंत्र स्वरूपात देण्यात आली. मात्र, विवेकानंद महाविद्यालय केंद्रावरील इंग्रजी व मॅथेमेटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांना चुकीच्या उत्तरपत्रिकांचे वितरण झाले. वितरणातील चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे ‘सेट’ परीक्षेच्या कोल्हापूर विभागाचे समन्वयक पी. व्ही. अनभुले यांनी सांगितले. ते म्हणाले, चुकीच्या उत्तरपत्रिकांचे वितरण झाल्याचे लक्षात येताच त्याची माहिती पुणे विद्यापीठातील ‘सेट’ विभागाला दिली. त्यांच्या सूचनेनुसार उत्तरपत्रिका बदलून देण्याबाबत कार्यवाही केली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे.