नूल : शिक्षण केवळ दहावीपर्यंत. स्वत:चा शेती व्यवसाय सांभाळत त्याचा शेतातील झाडा-झुडपांशी संबंध आला आणि त्यातून त्याला काष्ठशिल्प तयार करण्याचा छंद जडला. लाकडाच्या टाकाऊ ओंडक्यांपासून त्याने ३० ते ३५ शिल्पे तयार केली आहेत. या युवा शिल्पकाराचे नाव आहे सागर रामचंद्र नाशिपुडे (रा. नांगनूर, ता. गडहिंग्लज).त्याने काष्ठशिल्प तयार करण्याचे कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही; पण निसर्गचित्रे, परिसराचे निरीक्षण करण्याची सवय त्याला आहे. इतरांना जमते, मग आपणास ती का येत नाही, हा प्रश्न त्याला नेहमी पडतो. या निरीक्षण व प्रश्नांतून त्याने ही कला आत्मसात केली आहे.आतापर्यंत त्याने लिंबाच्या ओंडक्यापासून टी-पॉय, पेरूच्या लाकडापासून शोकेस, टेलिफोन स्टँड, नारळाच्या फांदीपासून जहाज, बांबूच्या बेटापासून झुंबर, शाळूच्या धाटापासून स्त्री व श्रीरामाची प्रतिकृती तयार केली आहे. वेगवेगळ्या फुलदाण्यांनी कपाट भरले आहे. त्याने सहा इंचांपासून सहा फुटांपर्यंत शिल्पे तयार केली आहेत. या शिल्पांचे प्रदर्शन भरविण्याचा त्याचा मनोदय आहे. या कलेच्या साधनेत त्याला आई सुवर्णा, पत्नी तेजश्री यांची साथ लाभते. (वार्ताहर)
टाकाऊ लाकडांपासून साकारली काष्ठशिल्प
By admin | Published: September 18, 2014 11:31 PM