कोल्हापूर : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेला आज, मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेसाठी कोल्हापूर विभागातून यावर्षी १,३०,२५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
परीक्षार्थींना चप्पल, बूट, सॉक्स, बेल्ट बाहेर ठेवून परीक्षा कक्षामध्ये प्रवेश करावा लागला. त्यांना मोबाईल, कॅमेरा असणारे स्मार्ट वॉच (घड्याळ), स्मार्ट पेन वापरण्यास बंदी करण्यात आली होती. आपल्या पाल्यांना सोडण्यास आलेल्या पालकांमुळे शहरातील प्रत्येक परीक्षा केंद्राबाहेर प्रचंड गर्दी झाली आहे.बारावीची परीक्षा १८ मार्चपर्यंत चालणार आहे. विद्यार्थी, पर्यवेक्षक, कर्मचारी यांना परीक्षा केंद्रांवर मोबाईल वापरण्यास बंदी आहे. परीक्षार्थीं मंगळवारी परीक्षा केंद्रांवर पेपरपूर्वी अर्धा तास आधी हजर होते. त्यामुळे पालकांची प्रचंड गर्दी झाली होती. पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता.परीक्षा केंद्रांवर २१ भरारी पथकांची नजरकोल्हापूर विभागातील १५७ केंद्रांवर परीक्षा सुरु आहे. कॉपीमुक्त अभियानासाठी कोल्हापूर विभागाने एकूण २१ भरारी पथके नेमली असून कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी सात भरारी पथके कार्यान्वित आहेत. त्यासह प्रत्येक जिल्हा प्रशासनाची भरारी पथके, दक्षता पथके गोपनीय पद्धतीने कार्यरत असतील अशी माहिती शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागाचे सचिव सुरेश आवारी यांनी दिली.समुपदेशक असे
- कोल्हापूर : शशिकांत कापसे - ९१७५८८०००८
- सांगली : भारती पाटील - ९५७९६८०१०८
- सातारा : दीपक कर्पे - ९८२२३५२६२०
(कार्यालयात हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ०२३१ - २६९६१०१, २६९६१०२, २६९६१०३ या ठिकाणी संपर्क साधावा.)आकडेवारी दृष्टिक्षेपातविद्याशाखानिहाय परीक्षार्थी
- कला : ४०,९०९
- विज्ञान : ५४,२५८
- वाणिज्य : २८,९०१
- किमान कौशल्य : ६,१८२
- नियमित परीक्षार्थी : १,२४,४१०
- पुनर्परीक्षार्थी : ६,१८२
- मुले : ७३,२२५
- मुली : ५७,८७०जिल्हानिहाय परीक्षार्थी
- कोल्हापूर : ५४,८७०
- सांगली : ३६,१६३
- सातारा : ३९,२१७