कळे : शेतकऱ्यांच्या हिताची ध्येय व धोरणे राबवून यशवंत बँकेने कोल्हापूर जिल्ह्यात सभासद व ग्राहक यांच्यात आपली बँक अशी प्रतिमा निर्माण केली आहे. त्यामुळे कोरोना काळातही बँकेने व्यवसायात उत्तुंग भरारी घेतली आहे, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी केले. यशवंत बँकेच्या कळे (ता. पन्हाळा) येथील स्वमालकीच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पाटील म्हणाले यशवंत बँकेने सहकारी बँका रिझर्व्ह बँकेच्या नियमावलीने अडचणीत येत असताना सभासद व ग्राहकांच्या सहकार्यातून कर्मचारी व संचालकांच्या कुशल कामकाजातून ठेवी, कर्जे, व भागभांडवल यांच्यात झपाट्याने वाढ केली आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोनाचा काळ असतानाही यशवंत बँकेची व्यवसायातील गरुडभरारी नजरेत भरणारी आहे यामुळे राज्य व देशपातळीवरील पुरस्कारही बँकेला मिळालेले आहेत. बँकेने मराठा युवकांना विशिष्ट शेती कर्ज देण्यासाठी प्राधान्य दिले आहे. शेतीवर अण्णासाहेब महामंडळ यांच्या माध्यमातून मोठा कर्जपुरवठा केला आहे. त्याची वसुली चांगल्या पद्धतीने असल्याने बँकेच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे, असे सांगितले. बँकेची दोन एटीएम सेंटर असून कळे येथेही एटीएम सेवा देण्याची सोय करणार असल्याचेही सांगितले.
यावेळी संचालक प्रकाश पाटील, निवास पाटील, बाजीराव खाडे, सुभाष पाटील, भगवान सूर्यवंशी, उत्तम पाटील, दादासाो पाटील संग्राम भापकर, एस. के. पाटील, सर्जेराव पाटील, आनंदराव पाटील, प्रकाश देसाई प्रा. टी. एल. पाटील, राजश्री भोगावकर, संभाजी नंदिवाले यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब कांबळे, शाखाधिकारी एच. एस. पाटील आदी उपस्थित होते.
सोबत फोटो मेल केला आहे -
यशवंत बँकेने कळे (ता. पन्हाळा) येथील स्वमालकीच्या इमारतीत प्रवेश केला. यावेळी बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील. सोबत बँकेचे संचालक व मान्यवर उपस्थित होते.