पन्हाळा : पन्हाळा नगरपरिषदेतील जनसुराज्य शक्ती पक्षाच्या विद्यमान नगरसेविका व माजी उपनगराध्यक्षा यास्मिन उमरफारूक मुजावर यांच्यासह दोन माजी नगरसेवकांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या तिघांच्या प्रवेशाने पन्हाळ्यात जनसुराज्य शक्ती पक्षाला खिंडार पडल्याची चर्चा आहे.पन्हाळा नगरपरिषदेच्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या यास्मिन ह्या विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांनी आपले जुने घर पाडुन नवे घर बांधत असता शेजारी राहणारे मुनिर इब्राहीम मुल्ला यांचे जागेत केलेले अतिक्रमण सिद्ध झाल्याने ३ नोव्हेंबर २०१८ रोजी जिल्हाधिकारी यांनी त्यांचे नगरसेवक पद रद्द केल्याचा आदेश दिला. यावर यास्मिन यांनी तत्कालीन नगरविकास मंत्री रणजित पाटील यांच्याकडुन आदेशला स्थगीती घेतली.
यावर तक्रारदार मुनीर मुल्ला उच्य न्यायालयात गेले. न्यायालयाने चार महिन्यात निकाल देण्याचे आदेश दिले पण विधानसभा निवडणुक व कोरोनामुळे हा निकाल लांबला आहे. तक्रारदारांनी पुन्हा राज्यसरकारचा दरवजा ठोठावला, असता नगारविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ऑनलाइन पद्धतीने २९ आक्टोंबर २०२० रोजी सुनावणी घेतली. येणाऱ्या सोमवारी हा निकाल होता, त्यापुर्वीच यास्मिन यांनी घाईने शिवबंधन स्विकारले. यास्मिन यांचे घर बांधणीला पुरातत्व खात्याची परवानगी नाही, त्यांना केवळ जुने घर दुरुस्तीचा परवाना पुरातत्व विभागाने दिला होता