सरवडे : सरवडे येथील ग्रामदैवत विठ्ठलाई देवीची बुधवार (३ मार्च) रोजी होणारी माघी यात्रा कोरोना पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याची माहिती सरवडे ग्रामपंचायत व विठ्ठलाई देवस्थान समिती यांनी दिली.
दरवर्षी सरवडे येथील विठ्ठलाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहाने भरते. कोरोनाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने व जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार यात्रेनिमित होणारी गर्दी टाळण्यासाठी मंगळवार २ मार्च रोजी होणारा विठ्ठलाई देवीचा जागर व बुधवार ३ मार्च रोजी होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी व देवस्थान समितीने बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे.
यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी व विठ्ठलाई देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.