कोल्हापूर : इस्लामपूरच्या वाय. सी. कॉलेजने इस्लामपूरच्याच के. बी. पी. कॉलेजचा ४-३ असा टायब्रेकरवर पराभव करीत संजीवन इंजिनिअरिंग कॉलेजमार्फत आयोजित शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय पुरुष हॉकी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे आज, शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात पूर्णवेळ सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्याने वाय. सी. कॉलेजने इस्लामपूरच्याच के. बी. पी. कॉलेजचा ४-३ असा टायब्रेकरवर पराभव केला. यामध्ये वाय. सी.कडून पंकज पाटील, महेश खंबे, वैभव खंबे, सागर पाटील यांनी, तर के.बी.पी. कडून राजेंद्र पवार, अक्षय जाधव, धोंडिबा पुजारी यांनी गोल केले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात मुधोजी कॉलेज, फलटणने गडहिंग्लजच्या शिवराज कॉलेजचा टायब्रेकरवर ४-२ असा पराभव केला. या स्पर्धेतून शिवाजी विद्यापीठाच्या हॉकी संघाची निवड करण्यात आली. स्पर्धेचा बक्षीस समारंभ माजी नगरसेवक जगमोहन भुर्के, विजय साळोखे, संजय पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रा. रणजित इंगवले, प्रा. विकास जाधव, प्रा. लक्ष्मण सातपुते, अशितोष पाटील, नजीर मुल्ला, प्रा. ए. यु. माने उपस्थित होते. पंच म्हणून सागर जाधव, योगेश देशपांडे, गणेश पोवार, सचिन शेलार यांनी काम पाहिले.
‘वायसी’ कॉलेजची बाजी
By admin | Published: December 27, 2014 12:25 AM