कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रौत्सवात भाविकांना यंदा करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे फक्त लाईव्ह दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे मंदिरात भाविकांना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
घडावे यासाठी लाईव्ह दर्शनाची सोय केली असून शहरात उभा मारुती चौक, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, ताराबाई रोड, राजारामपुरी, कसबा बावडा यांसह ठिकठिकाणी एलईडी स्क्रीन लावले जातील. मंदिराच्या चारही दरवाजांबाहेर मोठे टीव्ही लावण्यात येणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या नवरात्रौत्सवात कोणत्याही भाविकाला मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. पंचमी, अष्टमी व दसरा या तीन दिवशी कडक बंदोबस्तात व मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देवीची उत्सवमूर्ती मंदिराबाहेर येईल.ते म्हणाले, परंपरेप्रमाणे नवरात्रौत्सव देवीचे सर्व धार्मिक विधी व सालंकृत पूजा केल्या जातील. कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही मान्यवरांना दर्शनासाठी सोडले जाणार नाही. सकाळचे अभिषेक, रात्रीचे पालखी पूजन देवस्थानकडूनच केले जाईल. पंचमी, अष्टमी आणि दसऱ्याला अंबाबाईची उत्सवमूर्ती वाहनातूनच नेली जाईल. यावेळी भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
अष्टमीला देवीचे वाहन सजवलेल्या वाहनात ठेवले जाईल. तेथून गुजरीमार्गे ते भवानी मंडपात जाईल. येथे तुळजाभवानी देवीच्या मंदिरात आरती झाली की गुरुमहाराज वाड्यापासून बिनखांबी गणेश मंदिरमार्गे महाद्वारातून पुन्हा मंदिरात येईल.
कोरोनाबाबतची खबरदारी म्हणून उत्सवकाळात रोज मंदिरात सॅनिटायझेशन केले जाईल. परिषदेस सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, सहसचिव शीतल इंगवले, मिलिंद घेवारी, सुयश पाटील, राहुल जगताप, उपस्थित होते.१० कोटींचे उत्पन्न बुडालेकोरोनामुळे मंदिर मार्च महिन्यापासून बंद असल्याने देवस्थान समितीचे आजवर १० कोटींचे उत्पन्न बुडाले आहे. नवरात्रौत्सवाच्या दहा दिवसांत समितीला दोन कोटींचे उत्पन्न मिळते, तेदेखील यंदा मिळणार नाही.