शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

यंदाचे वर्ष भारतीय टेनिससाठी यशस्वी

By admin | Published: November 10, 2015 11:10 PM

यंदाचे वर्ष भारतीय टेनिससाठी खूप यशस्वी ठरले. पाच ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवून भारतीयांनी आपली चमक दाखवली. त्यामुळे भारतीय टेनिसची वेगाने प्रगती होत आहे

कोल्हापूर : घरावर आकाशकंदील, विद्युत रोषणाई आणि मिणमिणत्या पणत्यांनी मंगळवारी नरकचतुर्दशी (दीपावली)निमित्त शहर उजळले होते आणि दुसरीकडे आज, बुधवारी होणाऱ्या लक्ष्मीपूजनाने शहरातील बाजारपेठा फुलल्या होत्या. झेंडूची फुले, शेवंती, गलाटा, गुलाब घेण्यासाठी बाजारात ग्राहकांची लगबग सुरू होती. मंगळवारी नरकचर्तुदशीच्या पहाटे प्रत्येकाच्या घरोघरी आकर्षक रांगोळ्या काढल्या जात होत्या. गुलाबी थंडीच्या वातावरणात घरांवरील आकाशकंदील आणि विद्युत रोषणाईने गल्ल्या उजळून निघाल्या होत्या. त्यातच अभ्यंगस्नानासाठी घरामध्ये बालगोपालांसह ज्येष्ठांची घाईगडबड सुरू होती. उटणे, सुवासिक तेल लावून सर्वांनी अभ्यंगस्नान केले. त्यानंतर ओवाळणी करून घेऊन अनेकांनी फराळाचा आस्वाद घेतला. नवीन कपडे परिधान करून दीपावलीच्या शुभेच्छा देत अनेकजण एकमेकांना आलिंगन देत होते. फोनवरून, सोशल मीडियावरून दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता.अनेक महिलांची दुपारनंतर आज, बुधवारी होणाऱ्या लक्ष्मीपूजनाची व खरेदी करण्याची तयारी सुरू होती. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी होती. सायंकाळनंतर पुन्हा गल्लीबोळ दीपोत्सव व रोषणाईच्या झगमगाटाने उजळून निघाले. विविधरंगी फटाक्यांची आतषबाजी रात्री दहा वाजेपर्यंत सुरू होती. बालगोपालांसह ज्येष्ठांनीही गल्ल्यांमध्ये फटाके उडवून आनंद लुटला.झेंडू दराची उसळी; प्रतिकिलो ८० ते १२० रु.लक्ष्मीपूजन आणि पाडवा या दोन्ही दिवशी झेंडूच्या फुलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे बाजारात झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाली असून, ८० ते १२० रुपये किलो असा दर होता. लाल, केशरी व पिवळ्या रंगांच्या फुलांना मागणी होती. त्यासह पूजेसाठी लागणारी पाच फळे ३० ते ४० रुपयांना मिळत होती. याशिवाय केरसुणी, आंब्याची पाने, पानसुपारी, बदाम, प्रसादासाठी बत्तासे, चिरमुरे, सुवासिक अगरबत्ती, धूप, फळे, वही या साहित्याची खरेदी केली जात होती. यासाठी जोतिबा रोड, मिरजकर तिकटी, महानगरपालिका चौक, भाऊसिंगजी रोड, शिंगोशी मार्केट, टिंबर मार्केट, बिंदू चौक या बाजारपेठांत नागरिकांची गर्दी होती.आज लक्ष्मीपूजन; खरेदीसाठी बाजारपेठ फुल्लकोल्हापूर : सुख, शांती लाभावी आणि समृद्धी नांदावी यासाठी दिवाळी अमावास्येला लक्ष्मी-कुबेराचे पूजन करण्याची पद्धत आहे. आज, बुधवारी सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे. दिवाळी उत्सवातील अत्यंत महत्त्वाचा विधी मानल्या जाणाऱ्या या लक्ष्मीपूजनाच्या तयारीची मंगळवारी नागरिकांची लगबग सुरू होती. दिवाळीत वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशीनंतर अमावास्येला लक्ष्मी-कुबेराचे पूजन केले जाते. दिवाळीतील हा विधी महत्त्वपूर्ण आहे. आपल्या व्यवसायात, नोकरीच्या ठिकाणी यश मिळावे, घरात लक्ष्मीचा वास असावा आणि तिच्या कृपेने घरात सुख-शांती व समृद्धी नांदावी, अशी मनोकामना करत ही पूजा केली जाते. सायंकाळच्या प्रसन्न वातावरणात केल्या जाणाऱ्या या पूजेने मन अगदी प्रसन्न होते. घराप्रमाणेच दुकानात, कार्यालयांमध्ये आवर्जून लक्ष्मीपूजन केले जाते. अमावास्या मंगळवारी रात्री नऊ वाजून २२ मिनिटांनी सुरू झाली असून, बुधवारी रात्री ११ वाजून १६ मिनिटांनी संपणार आहे. लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त बुधवारी सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत आहे. लक्ष्मीपूजनाच्या साहित्य खरेदीसाठी मंगळवारी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होती.चरणस्पर्श...अंबाबाई किरणोत्सव : आज शेवटचा दिवसकोल्हापूर : किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सायंकाळी पाच वाजून ४७ मिनिटांनी सूर्यकिरणांनी श्री अंबाबाई देवीचा चरणस्पर्श केला. आज, बुधवारी किरणोत्सवाचा तिसरा व अंतिम दिवस आहे. किरणोत्सवासाठी भाविकांची मंदिरात तुडुंब गर्दी होती.मंगळवारी दुसऱ्या दिवशी ढगाळ वातावरणामुळे सायंकाळी पाच वाजून ४३ मिनिटांनी किरणे मंदिरातील गाभाऱ्यात आली. नंतर ती पितळी उंबरठ्यापर्यंत जाऊन पोहोचली. त्यानंतर पाच वाजून ४७ मिनिटांनी श्री अंबाबाई देवीला किरणांचा चरणस्पर्श झाला व थोड्यावेळाने ती लुप्त झाली. त्यानंतर देवीची आरती झाली. हा किरणोत्सव पाहण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सचिव शुभांगी साठे, व्यवस्थापक धनाजी जाधव, प्रा. किशोर हिरासकर यांच्यासह भक्तांनी गर्दी केली होती. दरम्यान, ढगाळ वातावरण आणि उंच-उंच इमारतींमुळे किरणोत्सवात अडथळे येतच आहेत.