कोल्हापूर : राज्यभर गाजलेल्या दर्शन रोहित शहा या १० वर्षांच्या शाळकरी मुलाच्या खून खटल्यात योगेश उर्फ चारू आनंदा चांदणे (२७) याला दोषी ठरवून, दुहेरी जन्मठेप व एक लाख पाच हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी मंगळवारी ठोठावली. दंडातील एक लाख रुपये रक्कम दर्शनची आई स्मिता शहा यांना नुकसानभरपाई म्हणून देण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. या खटल्याचे कामकाज तीन वर्षे चालले.कोल्हापुरातील देवकर पाणंद येथील दर्शनचे २५ डिसेंबर २०१२ रोजी अपहरण करून २५ तोळे दागिन्यांची खंडणी मागतली होती. त्यानंतर त्याचा खून करण्यात आला. या प्रकरणी चारू चांदणे याच्याविरोधात जुना राजवाडा पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. ज्येष्ठ विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ३० साक्षीदार तपासून २२ परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी तयार करून खटला मजबूत केला होता.पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांचे कौतुकदर्शन शहा खूनप्रकरणाचा तपास जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक केल्याने आरोपीला शिक्षा लागल्याचे अॅड. उज्ज्वल निकम यांनी न्यायालयासमोर स्पष्ट करत केडगे यांचे अभिनंदन केले.
खूनप्रकरणी योगेश उर्फ चारू चांदणेला दुहेरी जन्मठेप व एक लाख पाच हजार रुपये दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 4:47 AM