शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

तुम्ही फक्त जय म्हणा!

By admin | Published: February 07, 2017 11:15 PM

तुम्ही फक्त जय म्हणा!

श्रीनिवास नागेवर्षभरापूर्वीचा काळ असावा. वाळवा तालुक्यातल्या एका गावात सभा सुरू होती. सदाभाऊ खोत बोलायला उभे राहिले. भाषेचा ग्रामीण लहेजा. रांगडा बाज. त्याला जोड म्हणून अस्सल गावपांढरीतली उदाहरणं. त्यामुळं भाऊंच्या भाषणाला गर्दी उसळलेली. भाऊ प्रस्थापित पुढाऱ्यांवर घसरतात. घसरत-घसरत घराणेशाहीवर येतात. नेते अन् त्यांच्या वारसदारांवर तोंडसुख घेतात, ‘अरं, सत्तेची फळं तुमाला आनी तुमच्या घरातल्यांनाच चाखायला पाह्यजेत व्हय... सामान्य कार्यकर्त्याच्या आया बाळांतीण झाल्या न्हाईत काय?’सदाभाऊंच्या सडेतोड सवालानं जमलेले कार्यकर्ते, तरणी पोरं, बाया-बापड्या खूश. शिट्ट्या अन् टाळ्यांचा पाऊस पडतो. भाषण रंगत जातं. भाऊंचा सगळा रोख घराणेशाहीवरच असतो......अन् सोमवारी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी वाळवा तालुक्यातल्या बागणी गटातून भाऊंच्या चिरंजीवांची उमेदवारी जाहीर झाली. ही कार्यकर्त्यांची वानवा, की सत्तेची फळं घरातच राहण्यासाठी पाहिलेली सोय? ज्या रयत विकास आघाडीला भाऊंनी जन्माला घातलं, त्या आघाडीतून भाऊंचे चिरंजीव लढताहेत. घराणेशाहीचा वारसा तिसऱ्या पिढीत कसोशीनं जपणारे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्या मुलाविरोधात! उमेदवारी जाहीर झाली... मग सुरू झाला, सोशल मीडियातल्या पोस्टस्चा भडीमार. ‘भाऊ, आता कुठं गेली घराणेशाहीवरची टीका?’, ‘आता का गप्प आहात? तुमच्या कार्यकर्त्यांनीही नुसत्या सतरंज्याच उचलायच्या का?’, ‘तुम्हीही प्रस्थापितांच्या वळचणीला जाऊन तथाकथित प्रस्थापितच बनला काय?’ अशा पोस्ट फिरू लागल्या. (नतद्रष्ट सगळे. भाऊ, असल्या पोस्टकडं बिलकूल लक्ष द्यायचं नसतं हं..!)भाऊंच्या चिरंजीवांची उण्यापुऱ्या तीन-चार महिन्यांची राजकीय कारकीर्द. तीही डिजिटलवर झळकण्यापुरती. ज्या परिसरानं त्यांना धडपणानं पाहिलं नाही, ऐकलं नाही, अशा परिसरातून ते लढताहेत. (भाऊ नाही का, लोकसभेला माढ्यातून लढले!) संघर्षातून घडलेल्या चळवळ्या नेत्याचा हा वारसा. सदाभाऊ अन् स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी आता बागणी-आष्टा भागातल्या सभा पुन्हा गाजवतील. तडाखेबंद भाषणे ठोकतील, तरण्या पोरांचं रक्त सळसळायला लावतील, प्रस्थापितांवर घसरतील, टाळ्या मिळवतील... पण त्यात नसेल फक्त घराणेशाहीचा मुद्दा...---------------------------सांगली जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या नाड्या जयंत पाटील यांच्या हातात आहेत, पण त्या हल्ली सैल झाल्यात. त्यांच्याकडून भाजपकडं जाणाऱ्यांची रीघ संपता संपेना. राजकारणातले अन् प्रत्यक्षातलेही ‘टेक्नोसॅव्ही’ अशी इमेज असणाऱ्या जयंतरावांना हे ‘आऊटगोऊंग’ रोखता येत नसल्याचं दिसतंय. एकेकाळी (अगदी आता-आतापर्यंत) ‘जेजेपी’ चालवणाऱ्या जयंतरावांना ‘बीजेपी’नं हैराण केलंय. हतबल झालेत ते. राजकारणावरची त्यांची मांड निसटू लागलीय. राजकारणातली ही असुरक्षितता मेंदू कुरतडू लागते, तेव्हाही घराणेशाहीच आधाराला येते बहुदा. इस्लामपूर मतदारसंघातल्या जिल्हा परिषद गटांत कोंडी करण्याचा बेत विरोधकांच्या तंबूत शिजत असताना ती कोंडी फोडण्यासाठी जयंतरावांनी आपल्या घराचाच आधार घेतलाय. चुलत चुलत बंधू जनार्दनकाकांच्या घरातच त्यांनी तीन तिकिटं दिलीत. जनार्दनकाका हे कासेगाव परिसरातले मातब्बर नेते. त्यांच्या कन्येला कासेगाव जिल्हा परिषद गटातून, त्यांचे चिरंजीव देवराज यांना कासेगाव गणातून अन् त्यांच्या भगिनीला वाटेगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी जयंतरावांनी बहाल केलीय. मागे सांगली महापालिकेच्या निवडणुकीत महाआघाडी केल्यानंतर त्यांनी मिरजेच्या नायकवडी घराण्यात तीन तिकिटं दिली होती. शिवाय काँग्रेसनंही नायकवडींपैकी दोघांना उमेदवारी दिली होती! तब्बल पाच तिकिटं मिळवणाऱ्या या घराण्याचं ‘इलेक्टिव्ह मेरिट’ जयंतरावांनी हेरलं होतं. (नंतर नायकवडींनी त्यांना मिरजेचं पाणी पाजलं, ही गोष्ट अलाहिदा!) पण आता जयंतरावांचं ‘इलेक्टिव्ह मेरिट’ आता ‘सिलेक्टिव्ह’ झालंय...वर्षानुवर्षं सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते आणखी काही वर्षं सतरंज्याच उचलणार... ---------------------------एक जुना किस्सा. एका शैक्षणिक संस्थेतला.वसंतदादा पाटील भाषण संपवून मंचावरून उतरले. विशीतला एक विद्यार्थी सामोरा आला अन् म्हणाला, ‘दादा तुमचे विचार मला पटलेत. मी तुमच्या पक्षात काम करू इच्छितो.’दादांनी त्याच्या खांद्यावर हात टाकला अन् उत्तरले, ‘मित्रा, अगोदर शिक्षण घे. पोटाचा प्रश्न सोडव. मग चळवळीत-पक्षकार्यात ये. उपाशीपोटी बनलेला कार्यकर्ता लाचार बनतो..!’