पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, कुबेर हा गावातील ओढ्याकडेला चारा आणण्यासाठी गेला होता. ओढ्याजवळ गवतात विद्युत तारा तुटून पडली होती. गवतामुळे तुटून पडलेली तारा त्यांना दिसली नाही. त्यामुळे तारेला स्पर्श होऊन बसलेल्या जोरदार विद्युत धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, बहीण असा परिवार आहे.
---------------------
कुटुंबाचा आधार हरपला
कुबेर हा एकुलता होता. त्याच्या वडिलांचेही निधन झाले आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरच होती. मोलमजुरी करून व भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. घरातील कर्त्या पुरुषाच्या दुर्दैवी मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
---------------------
तालुक्यातील दुसरी घटना
अलीकडे तालुक्यातील जरळी येथेही तुटलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श होऊन दोन मेंढ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेत मेंढपाळ दाम्पत्याचा सुदैवाने जीव वाचला. त्यानंतर मुत्नाळमध्ये घडलेली ही तालुक्यातील दुसरी घटना आहे.
-------------------------
महावितरणकडून ऑडिट आवश्यक
गंजलेले लोखंडी खांब, तुटलेल्या तारा यामुळे पावसाळ्यात अशा घटना वारंवार घडत असतात. त्यामुळे अनेकांचा नाहक बळी जातो. पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून सर्व गावांतील जीर्ण खांब व तारांचे सर्व्हे करून त्वरित बदलणे गरजेचे आहे.
-------------------------
* कुबेर दळवी : १५०६२०२१-गड-१३