शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

उत्तूरजवळील अपघातात गडहिंग्लजचा युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 7:21 PM

Bike accident kolhpaur-उत्तूर-निपाणी मार्गावर दुचाकीची कारला धडक बसून झालेल्या अपघातात ओंकार विजयकुमार पाटील (वय २५, मूळ गाव भादवणवाडी, ता. आजरा, सध्या रा. सिद्रामलनी, गडहिंग्लज) हा युवक ठार झाला. हा अपघात सायंकाळी सातच्यासुमारास घडला. याबाबत आश्लेश देवदास आजगेकर (आजरा) यांनी पोलिसात वर्दी दिली.

ठळक मुद्देउत्तूरजवळील अपघातात गडहिंग्लजचा युवक ठार

उत्तूर : उत्तूर-निपाणी मार्गावर दुचाकीची कारला धडक बसून झालेल्या अपघातात ओंकार विजयकुमार पाटील (वय २५, मूळ गाव भादवणवाडी, ता. आजरा, सध्या रा. सिद्रामलनी, गडहिंग्लज) हा युवक ठार झाला. हा अपघात सायंकाळी सातच्या सुमारास घडला. याबाबत आश्लेश देवदास आजगेकर (आजरा) यांनी पोलिसात वर्दी दिली.अधिक माहिती अशी की, ओंकार हा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आपले काम संपवून मोटार ड्युक नं (एमएच ११सी. ए. ०२११) वरून गडहिंग्लजकडे जात होता, यावेळी समोरुन येणाऱ्या पिक गाडीस ओव्हरटेक करीत असताना समोरून येणाऱ्या अल्टो कारला (एमएच ०२ बी.डी.२६६६) धडक बसली. त्यानंतर दुचाकी फरफटत फोर्ड फिगो गाडी नं. (एमएच ०९ , सी. एम. ६०५४ ला धडकली.

धडक इतकी जोरात होती की ओंकार रस्त्यावर पडल्याने डोक्यास गंभीर मार लागला. त्याला आपटे फौंडेशनच्या रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज येथे नेण्यात आले. मात्र अधिक उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.त्याच्या पश्चात आई, दोन विवाहित बहिणी, भाऊ असा परिवार आहे. आजरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार बी. एस. कोचरगी करीत आहेत.हेल्मेट न०हते पाच वर्षांपासून ओंकार हा जिल्हा परिषदेत शिपाई म्हणून भरती झाला होता. तो प्राथमिक आरोग्य केंद्र उत्तूर येथे काम करीत होता . काम संपवून घरी जात असताना उत्तूर- निपाणी रस्त्यानजीक साखरू बाई पाटील यांच्या घराजवळ अपघात झाला. त्यावेळी त्याच्या डोक्यास हेल्मेट नव्हते. आकस्मिक घडलेल्या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Accidentअपघातbikeबाईकkolhapurकोल्हापूर