शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

डॉल्बी लावण्यावरून तरुणास भोसकले

By admin | Published: January 31, 2016 1:40 AM

चौघांवर गुन्हा : राजेंद्रनगरात वरातीवेळी घटना

कोल्हापूर : राजेंद्रनगर येथे ‘वडील आजारी आहेत, डॉल्बी हळू आवाजात लावा,’ असे सांगणाऱ्या तरुणाला चौघाजणांनी चाकूने भोसकले. तानाजी अंकुश कांबळे (वय २०) असे त्याचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २९) रात्री घडली. या हल्ल्यामुळे राजेंद्रनगर परिसरात तणाव आहे. जखमी कांबळे याने दिलेल्या फिर्यादीनुसार राजारामपुरी पोलिसांनी संशयित आरोपी सुखदेव बुध्याळकर, शिवराम बुध्याळकर, नागेश शिंपी, दशरथ सावंत (सर्व, रा. राजेंद्रनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिसांनी सांगितले, तानाजी कांबळे याचे वडील आजारी आहेत. शुक्रवारी (दि. २९) रात्री या परिसरात लग्नाची वरात निघाली होती. यावेळी तरुण डॉल्बी लावून धिंगाणा घालत होते. डॉल्बीच्या आवाजाने त्याच्या वडिलांना त्रास होऊ लागला. त्यामुळे तो वरातीमध्ये धिंगाणा घालणाऱ्या सुखदेव बुध्याळकर, शिवराम बुध्याळकर, नागेश शिंपी, दशरथ सावंत यांना डॉल्बी हळू आवाजात लावा, असे सांगू लागला. त्यावर या तरुणांनी चाकू काढून त्याला भोसकले. वरातीमध्ये हल्ला झाल्याने गोंधळ उडाला. या घटनेची माहिती राजारामपुरी पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आल्याचे पाहून तरुणांनी तेथून पळ काढला; तर वरात अर्ध्यावरच बंद केली. जखमी तानाजी याला नातेवाइकांनी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याने वरील चौघांविरोधात फिर्याद दिली. अधिक तपास राजारामपुरी पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)