कोल्हापूर : पाय ठेवायलाही जागा नसावी इतकं खचाखच भरलेलं केआयटीचं ओपन एअर थिएटर, तब्बल 2 हजार विद्यार्थी, व्यासपीठावरती नाना पाटेकर, इरावती हर्षे, सतीश राजवाडे, निखील साने ही दिग्गज कलाकार मंडळी या सगळया वातावरणाने आज केआयटी फुलून गेले. नाना : आपला मानूस हा गप्पांचा कार्यक्रम केआयटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, कोल्हापूर च्या वतीने आयोजित करण्यात आला होता.अतिशय विनोदी आणि खुमासदार शैलीत तरुणांसोबत संवाद साधणारे नाना हे कुणी मोठी आसामी भासत नसून सबंध केआयटीच्या तरुणाईला त्यांचे मित्र म्हणून गप्पा मारत होते. त्यांनी मनोगत व्यक्त करताना देशसेवा, नातीगोती, आई-वडिलांच्या कष्टाची परतफेड, संयम या मुद्यांना स्पर्श करत विद्याथ्र्यांना भावुक साद घातली. सुरुवातीलाच त्यांनी हे स्पष्ट केले कि मी इथे चित्रपट प्रमोशनला आलेलो नाही तर विद्याथ्र्यांशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे.त्यांनी तरुणाईला सर्वात महत्वाचा संदेश दिला म्हणजे राजकारण्यांच्या धुर्त खेळीला बळी पडू नका. स्वत:ची जात घरात ठेऊन भारताचा नागरिक म्हणून रस्त्यावर उतरा. राजकारण्यांची मुले परदेशात शिकतात आणि दंगलीच्यावेळी गोरगरीबांची पोरं तुरुंगात जातात त्यामुळे स्वत:चा वापर कुणाला स्वार्थासाठी करु देऊ नका. स्वत:चा मेंदू, स्वत:चा विचार याचाच उपयोग करुन आयुष्य सुंदर बनवा.यावेळी विद्याथ्र्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देऊन काही संवाद त्यांनी सादर केले. यामध्ये त्यांनी नटसम्राट, यशवंत, रुमानी अशा प्रसिध्द स्वगतांनी विद्याथ्र्यांना तल्लीन केले व टाळया, शिटया आणि दंगा याने केआयटीचे वातावरण नानामय झाले.नानांनी त्यांच्या पन्नास वर्षाच्या नाटय व चित्रपट क्षेत्रातील अनुभवांना उजाळा देत त्यांचा जीवनप्रवास उलगडला. जुन्या कलाकारांचे किस्से, नाटकांच्या तालमी याबद्दलची माहिती ऐकुन केआयटीच्या विद्याथ्र्यांच्या ज्ञानात भर पडली. अभिनय क्षेत्रात येऊ इच्छिणा-या तरुणाईला त्यांनी प्रचंड कष्ट आणि अनुभव गाठीशी बांधण्याचा सल्ला दिला.यावेळी इरावती हर्षे, सतीश राजवाडे, निखील साने यांनीही विद्याथ्र्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देऊन आगामी आपला मानूस या चित्रपटाची माहिती दिली व कार्यक्रमाला अधिकच रंगत आणली. यावेळी केआयटीचे चेअरमन सचिन मेनन, सचिव साजिद हुदली, विश्वस्त सुनिल कुलकर्णी व संचालक डॉ. व्ही.व्ही.कार्जिन्नी, रजिस्ट्रार डॉ. एम.एम.मुजुमदार यांनी या सर्व मान्यवरांना कोल्हापुरी गुळ, रोप व केआयटीचे स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले. प्रा. प्रमोद पाटील सूत्रसंचालन तर प्रा. अमर टिकोळे, सुनिल माने, अमोल वाघमारे यांनी संयोजन केले.
जात घरात ठेवा, भारताचे नागरिक म्हणून बाहेर पडा : नाना पाटेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 7:13 PM
स्वत:ची जात घरात ठेऊन भारताचा नागरिक म्हणून रस्त्यावर उतरा...
ठळक मुद्देतुमचं नाणं खणखणीत असलं की काम मागावं लागत नाही : नाना पाटेकरखुमासदार शैलीने केआयटी मंत्रमुग्ध