शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
2
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
3
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
4
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
5
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
6
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
7
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
8
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
9
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
10
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
11
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
12
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
13
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
14
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
15
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
16
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
17
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
20
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम

युवापर्व; मात्र घराणेशाहीतच सर्व!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:21 AM

पोपट पवार । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांकडून सध्या युवकांना संधी देण्याचा डांगोरा पिटला जात ...

पोपट पवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांकडून सध्या युवकांना संधी देण्याचा डांगोरा पिटला जात असला तरी ज्यांना आखाड्यात उतरविण्याची तयारी केली जात आहे, अशा बहुतांश युवकांची पार्श्वभूमी तपासली तर राज्याच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा प्रस्थापित घराण्यांकडेच उमेदवारीचा रतीब घातला जात असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, विधानसभेच्या रणांगणातच अनेकांनी वंशपरंपरेने लाँचिंग करण्याची धडपड चालविल्याने चांद्यापासून बांद्यापर्यंत घराणेशाहीची मुळे प्रबळ होताना दिसत आहेत.‘पवार पर्व’ सुरू राहण्यासाठी नातू रोहित पवार यांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली आहे. यासाठी त्यांनी नगरमधील कर्जत-जामखेड मतदारसंघाची निवड केली आहे. रोहित यांनी दोन वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या शिवसेनेच्या ‘युवराजां’नाही सुरक्षित मतदारसंघ देण्यासाठी सेनेच्या आमदारांमध्ये चढाओढ लागली आहे. राज्याच्या राजकीय सारिपाटावर ‘आदित्योदय’ करण्यासाठी जळगाव ग्रामीण, मालेगाव पूर्व व वरळी विधानसभा मतदारसंघांतून ‘आवतण’ दिले गेले आहे. तिकडे माजी मंत्री सुनील तटकरे यांनाही आपला वारसदार विधानसभेत पाठविण्याची घाई झाली आहे. श्रीवर्धन मतदारसंघातून कन्या आदिती तटकरे यांच्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.काँग्रेसमधून भाजपवासी झालेले जिंतूरचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनाही कन्येच्या राजकीय कारकिर्दीला आयाम द्यायचा आहे. जिंतूर मतदारसंघातून मेघना यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. औरंगाबादच्या गंगापूर मतदारसंघातून माजी आमदार अण्णासाहेब माने यांचे पुत्र संतोष यांचे नावही शिवसेनेकडून आघाडीवर आहे.बीडमध्ये वारसदारांच्या लाँचिंगसाठी धडपड सुंदरराव सोळुंके, गोपीनाथ मुंडे, केशरकाकू क्षीरसागर अशा मातब्बर नेत्यांचा जिल्हा असलेल्या बीडमध्ये घराणेशाहीची परंपरा नेटाने चालविली जात आहे. माजी मंत्री विमलताई मुंदडा यांच्या सूनबाई नमिता यांना केजमधून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. गेवराईतही माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी पुत्र विजयसिंह यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे. स्वत: भाजपकडून विधान परिषदेचे सदस्य असूनही आष्टीच्या सुरेश धस यांना पुत्र जयदत्त यांच्या करिअरची चिंता लागून राहिली आहे. आष्टी मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न आहे.रामदासकदम यांनाहीपुत्राची काळजीखेड-गुहागर मतदारसंघात पराभव पदरी पडल्याने मागील दाराने जात मंत्रिपद मिळविणारे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना दापोलीतून पुत्र योगेश कदम यांच्यासाठी उमेदवारी हवी आहे.