शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

Kolhapur News: तरुणांच्या आत्महत्यांनी वाकरे हादरले, अंधश्रद्धेच्या अफवांना ऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2023 1:51 PM

तरणीताठी मुले मृत्यूला कवटाळत असल्याने पालकांची चिंता वाढली

प्रकाश पाटीलकोल्हापूर : कोणतेच फारसे गंभीर कारण नसताना वाकरे (ता. करवीर) येथील चार अविवाहित तरुणांनी गेल्या दीड महिन्यात आत्महत्या केल्याने गाव हादरला आहे. तरणीताठी मुले मृत्यूला कवटाळत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. आत्महत्या केलेले चारपैकी तिघेजण वाकरे पैकी पोवारवाडी येथील एकाच गल्लीत राहणारे आहेत. पाचजण आत्महत्या करणार असल्याची अफवा गावात असून, त्यामागे काही अंधश्रद्धा आहे का, याचा शोध घेण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पहिल्या दोन आत्महत्या झाल्यावर तू का अजून आत्महत्या केली नाहीस, असे तिसऱ्या तरुणाच्या स्वप्नात आले होते, अशीही चर्चा गावात आहे.युवराज पोवार याने पहिल्यांदा आत्महत्या केली. तो खासगी कंपनीत कामाला होता. त्यानंतर चारच दिवसांत शुभम पोवारने आत्महत्या केली. एकाच गल्लीत शेजारी राहणाऱ्या भाऊबंद व जीवलग मित्रांनी आत्महत्या केल्याने गाव हादरला. या आत्महत्या होऊन १५ दिवस होतात न होतात तोपर्यंत दुचाकी मेस्त्री असणाऱ्या नितीन मोरे याने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. ही आत्महत्या गावकरी विसरतात तोपर्यंत मंगळवारी (दि. ३१ जानेवारी) विशाल कांबळे याने आत्महत्या केली. विशाल फरशी फिटिंगचे काम करत होता.या चौघांचीही घरची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. शुभम हा आई-वडिलांना एकुलता होता. तो वडिलांच्याबरोबर कोल्हापूर येथे सुवर्ण कामासाठी जात होता. आई-वडिलांच्या सानिध्यात असताना तो भावना व्यक्त करत नसल्याने पालकांनाही त्यांच्या मनात काय चालू आहे, याचा अंदाज आला नाही. सर्व काही सुरळीत सुरू असताना या तरुणांनी जीवन संपवण्याचा घेतलेला निर्णय कुटुंब उद्ध्वस्त करणारा ठरत आहे.जीवघेणी अफवागेल्या दीड महिन्यात वाकरेमध्ये चौघांनी आत्महत्या केली. हातातोंडाशी आलेल्या मुलांचे आत्महत्येचे सत्र सुरू असल्याने पालक व ग्रामस्थांच्यात चिंतेचे वातावरण आहे. गावातील पाच तरुण आत्महत्या करणार असल्याची अफवा पहिल्या आत्महत्येदिवशी पसरली आणि त्यानंतर पाठोपाठ आत्महत्या झाल्याने ग्रामस्थांना हे रोखायचे कसे, असा प्रश्न पडला आहे.समुपदेशन शिबिरआत्महत्या सुरू झाल्याने शिवाजी विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाचे डॉ. प्रसन्न करंबळकर यांनी गावातील तरुणांशी संवाद साधला. आत्महत्या करणे चुकीचे आहे. तरुणांनी आपल्याला अडचणी असतील तर पालकांशी अथवा मित्रमैत्रिणीबरोबर संवाद साधा, असा सल्ला त्यांनी दिला तरीही आत्महत्या झाल्याने खळबळ उडाली.

तरुणांच्या आत्महत्येमुळे गावात पालकांत चिंता वाढत आहे. त्या टाळण्यासाठी समुपदेशनही करण्यात आले. परंतु त्यालाही यश आले नाही. ही लाट थोपवण्यासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज आहे. -सुभाष पाटील, यशवंत बँकेचे संचालक, वाकरे

अशा झाल्या आत्महत्या

  • ९ डिसेंबर २०२२ : युवराज भिकाजी पोवार (वय २७)
  • १३ डिसेंबर २०२२ : शुभम एकनाथ पोवार (वय २६)
  • १७ जानेवारी २०२३ : नितीन विलास मोरे (वय २२)
  • ३१ जानेवारी २०२३ : विशाल रामचंद्र कांबळे (वय २६)

आत्महत्येची कारणे...कोणतेच गंभीर कारण नसताना जर आत्महत्या होत असतील तर त्यामागे श्रद्धा-अंधश्रद्धेचे कारण असू शकते. त्या दृष्टीनेही ग्रामस्थांनी विचार करावा व त्यास पायबंद घालावा, असे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. पी. एम. चौगले यांनी सूचविले आहे. वाकरे (ता. करवीर) येथील आत्महत्या सत्र कशामुळे होत असेल व ते कसे रोखायचे, अशी विचारणा ‘लोकमत’ने त्यांच्याकडे केली. त्यांनी यामागील संभाव्य चार कारणे दिली.

  • देवदेवतांनी सांगितले, शाप दिला म्हणून आत्महत्या केली जावू शकते. त्या देवदेवतांवर या तरुणांची श्रद्धा असू शकते, त्यांचा प्रभाव असू शकतो. जेव्हा अन्य कोणतेच भौतिक, आर्थिक, आरोग्यविषयक कारण नसते तेव्हा होणाऱ्या आत्महत्यांमागे अंधश्रद्धा असू शकते.
  • या तरुणांचे लग्न ठरत नव्हते म्हणून आत्महत्या झाल्या का, याचाही शोध घेतला जावा.
  • करिअरमध्ये वैफल्य आल्यावर तरुणांत हा विचार बळावतो.
  • नैराश्यातून आत्महत्येचा विचार येऊ शकतो; पण त्याचे धाडस होत नाही. जेव्हा कोणतरी एकजण तसे अविचारी पाऊल उचलतो तेव्हा इतरही धाडस करतात.
  • जवळच्या व्यक्तीने एकाकी जीवन संपवले तर त्यातूनही कमालीचे वैफल्य येऊन आत्महत्या केली जाते. तसा काही बंध या तरुणांमध्ये आहे का, हे तपासले पाहिजे. 
टॅग्स :kolhapurकोल्हापूर