शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

डंपरच्या धडकेत तरूण ठार

By admin | Published: June 19, 2016 1:27 AM

इचलकरंजीतील सांगली रोडवरील घटना : संतप्त जमावाकडून डंपरवर दगडफेक

इचलकरंजी : येथील सांगली रोडवर मुरुम वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरच्या धडकेत यंत्रमाग कामगार जागीच ठार झाला. सूरज दिलीप मोरे (वय २६, रा. साईट नंबर १०२) असे त्याचे नाव आहे. हा अपघात शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातानंतर संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक करून तो पेटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत पोलिसांतून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सहकारनगर साईट नंबर १०२ परिसरात राहणारा सूरज मोरे हा यंत्रमाग कारखान्यात कामास होता. आपल्या मावस भावाला इचलकरंजी येथे सोडून तो सकाळी आपल्या होंडा शाईन या मोटारसायकलीवरून सहकारनगरकडे घरी परतत होता. या दरम्यान इचलकरंजीहून सांगली नाक्याकडे निघालेल्या भरधाव डंपर (एमएच ०९ सीए ७११) ने त्याच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात सूरज हा डंपरखाली सापडला. याचवेळी नागरिकांनी आरडाओरडा केल्याने चालकाने डंपर थांबवला व पुन्हा पाठीमागे घेतला. त्यामुळे सूरजच्या अंगावरून दोनदा डंपर गेला. यामध्ये तो जागीच ठार झाला. याबाबतची माहिती कळताच सूरज याच्या नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने डंपरवर दगडफेक करून काचा फोडल्या. तसेच डिझेलची टाकी फोडून डंपर पेटविण्याचा प्रयत्न केला. ही माहिती मिळाल्यानंतर गावभाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह आयजीएम रुग्णालयात आणून विच्छेदन केले. अपघाताची वर्दी गणेश बगाडे यांनी गावभाग पोलिसांत दिली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक युवराज सूर्यवंशी करत आहेत. सूरज हा मनमिळावू स्वभावाचा होता. त्याच्या मृत्यूमुळे सहकारनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे. (वार्ताहर)