शहरं
Join us  
Trending Stories
1
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
2
"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा
3
'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
4
मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत; वाई तालुक्यातील धक्कादायक घटना
5
VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
6
वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह
7
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
8
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
9
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
10
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
11
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
12
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
13
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
14
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
15
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
16
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
17
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
18
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा
19
Suraj Chavan : गुलीगत फेम सूरज चव्हाणला मिळणार मैत्रीण... फळ्यावर हार्ट इमोजी, त्यात कोरलंय S; 'ती' कोण?
20
भाजपाने युती धर्म पाळला असता, तर शिंदेंचे चार खासदार वाढले असते -बच्चू कडू

झिरो शॅडो डे: कोल्हापुरात भरदुपारी सावली ५० सेकंदांपर्यंत गायब झाली

By संदीप आडनाईक | Published: May 06, 2024 3:09 PM

शास्त्रज्ञांसह खगोलप्रेमींनी घेतला अनुभव

कोल्हापूर : कोल्हापूरकरांची सावली सोमवारी दुपारी १२ वाजून २९ मिनिटे ११ सेकंदापासून ते १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत म्हणजेच जवळजवळ ५० सेकंदापर्यंत गायब झाली. खगोलशास्त्राचे अभ्यासकांसह खगोलप्रेमींनी या शून्य सावली दिवसाचा अर्थात झिरो शॅडो घटनेचा अनुभव घेतला. तीन महिन्यांनी सूर्याच्या दक्षिणायन काळात ६ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांपासून ५० सेकंदांपर्यंत परत एकदा सावली गायब होणार आहे.कर्क वृत्त आणि मकर वृत्त या दोन वृत्तांमध्ये राहणाऱ्या लोकांना वर्षांतून दोन वेळेला या शून्य सावलीचा आनंद घेता येतो, त्यात कोल्हापुरचा समावेश असल्यामुळे सोमवारी दुपारी कोल्हापुरकरांनी शून्य सावलीचा अनुभव घेतला. शहरातील दसरा चौकात भर दुपारी १२ वाजून १९ मिनिटांनी कोल्हापुरातील अभ्यासकांनी सावधान स्थितीत उभे राहून आपली सावली गायब झाल्याचे पाहिले.विवेकानंद महाविद्यालयातील खगोल अभ्यासक प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर यांनी शास्त्रीय उपकरणांच्या सहाय्याने शून्य सावलीचा प्रयोग सहकाऱ्यांच्या उपस्थितीत अनुभवला. प्रा. कारंजकर यांनी रिट्रॉर्ट स्टॅन्ड, मेजरिंग सिलिंडर, बार मॅग्नेट, लेव्हल बॉटल, इंडेक्स पिनच्या सहाय्याने दुपारी १२ वाजून २९ मिनिटे ११ सेकंदापासून ते १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत सावली गायब झाल्याचे अनुभवले.शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अवकाश संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर यांनीही सोमवारी शून्य सावली दिवस शालेय विद्यार्थ्यांसोबत अनुभवला. दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी विविध पध्दतीने शास्त्रीय प्रयोगानुसार ५५ सेकंदासाठी सावली गायब झाल्याचा अनुभव घेतला. ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे. हा दिवस पृथ्वीच्या अक्षीय कलनाशी संबंधित आहे. अनेक संस्कृतीमध्ये या दिवसाला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे. पर्यटकांसाठीही हा दिवस आकर्षणाचा केंद्रबिंदू होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरZero Shadow Dayशून्य सावली दिवस