शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

जिल्हा परिषदेत मद्यधुंंद लिपिकाचा धिंगाणा -पोलिसांनी घेतले ताब्यात : मद्यप्राशन अहवाल,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:40 AM

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील लिपिकाने मद्यधुंद अवस्थेत मंगळवारी चक्क कार्यालयातच धिंगाणा घातला. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांना शिवीगाळ करीत त्याने टेबल-खुर्च्या भिरकावून

ठळक मुद्देआज निलंबन शक्य

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील लिपिकाने मद्यधुंद अवस्थेत मंगळवारी चक्क कार्यालयातच धिंगाणा घातला. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांना शिवीगाळ करीत त्याने टेबल-खुर्च्या भिरकावून दिल्या. अचानक घडलेल्या या प्रकाराने अधिकाºयांसह कर्मचारी भांबावून गेले. त्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने शाहूपुरी पोलिसांना कळविल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. संशयित लिपिक राजेश जयसिंग पवार (वय ४२, रा. देवाळे, ता. पन्हाळा) असे त्याचे नाव आहे.

दरम्यान, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख एस. एस. शिंदे यांनी लिपिक पवार याची वैद्यकीय तपासणी करून अहवाल आम्हाला पाठवून द्या; त्यानंतर आम्ही कारवाई करतो, असे शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांना कळविले. त्यानुसार पोलिसांनी पवारची वैद्यकीय तपासणी केली असता मद्यप्राशन केल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. तो पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला तत्काळ सादर केला. या अहवालावरून आज, बुधवारी पवारला निलंबित करण्याची दाट शक्यता आहे.

राजेश पवार हा लिपिक म्हणून काम करतो. तो कामावर असताना नेहमी नशेत असतो अशा तक्रारी होत्या. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास कार्यालयात त्याने मद्यप्राशन करूनच प्रवेश केला. कार्यालयातील खुर्चीवर बसून टेबलवर पाय ठेवले. येथील अन्य सहकाºयांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता तो संतापला. अधिकाºयांसह कर्मचाºयांना शिवीगाळ करीत टेबल-खुर्च्या भिरकावून दिल्या. कार्यालयातच आरडाओरडा करीत फरशीवर लोटांगण घातले. त्याचा हा धिंगाणा पाहून आजूबाजूच्या कार्यालयांतील कर्मचारी जमा झाले. अनेकांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला असता तो त्यांच्याच अंगावर धावून गेल्याने सर्वजण भांबावले.

पवार याचा हा धिंगाणा पाहून या विभागाचे अधिकारी संजय अवघडे यांनी विभागप्रमुख एस. एस. शिंदे यांना फोनवरून कळविले. त्यांनी पोलिसांना बोलविण्यास सांगितले. अवघडे यांनी फोन करताच काही क्षणांतच ‘शाहूपुरी’चे दोन पोलीस जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाले. नशेत असलेल्या पवार याला ताब्यात घेऊन त्यांनी त्याला पोलीस ठाण्यात आले. याठिकाणी मात्र त्याची बोलतीच बंद झाली. पोलिसांनी दोन-तीन कानशिलात लगावून त्याला धिंगाणा घातल्याचा जाब विचारला असता तो गप्प राहिला. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याला सोडून दिले.तिसºयांदा प्रकारराजेश पवार हा व्यसनाच्या आहारी गेला आहे. यापूर्वी दोन वेळा त्याने मद्यप्राशन करून कार्यालयात दंगा केला होता. तत्कालीन समाजकल्याण सभापतींनी त्याची पाठराखण करून निलंबनाची कारवाई टाळली होती. आता पुन्हा तिसºयांदा हा प्रकार घडल्याने जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी वैतागले आहेत. वैद्यकीय अहवालामध्ये त्याने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाल्याने आज, बुधवारी त्याच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.रुबाब मोठा...पवार यांचे कोणीतरी पाहुणे मंत्रालयात नोकरीस आहेत. त्यामुळे मी काही केले तरी माझे कुणी वाकडे करू शकत नाही, असे तो पोलीस धरून नेत असतानाही सांगत होता.वरिष्ठ अधिकाºयांसह कर्मचाºयांना शिवीगाळ करीत टेबल-खुर्च्या भिरकावून दिल्याकोल्हापूर जिल्हा परिषदेत ग्रामीण पाणीपुरवठा विभागात मद्यप्राशन करून धिंगाणा घालणाºया लिपिक राजेश पवार याला मंगळवारी शाहूपुरी पोलिसांनी पकडून नेले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद