कोल्हापूर : कोल्हापूरजिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीची कर्जमर्यादा २५ लाखांवरून ३५ लाख रुपये करण्याचा निर्णय वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची ५४ वी वर्षिक सर्वसाधारण सभा रविवारी संस्था कार्यालयात ऑनलाईन घेण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजीव परीट होते.अध्यक्ष परीट म्हणाले, संस्थेचे ३३३२ सभासद असून, १०३ कोटी ४६ लाखांच्या ठेवी आहेत. संस्थेने अहवाल सालात १०६ कोटी ४ लाखांची कर्जे वाटप केली असून, २५ कोटी ८९ लाखांची गुंतवणूक केली आहे. संचालक मंडळाने काटकसरीचा कारभार केल्याने तब्बल ३ कोटी १८ लाख रुपये निव्वळ नफा झाला आहे. सभासदांना १२.५० टक्के लाभांश, ११ टक्के कायम ठेवीवर व्याज, तर १० टक्के वर्गणी ठेवीवर व्याज देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.संस्थेच्या दुरुस्ती खर्चाबाबत सचिन जाधव यांनी विचारले. यावर केवळ हा खर्च दुरुस्तीवर नाहीतर सुरक्षा रक्षकांसह पाच शिपायांचा पगारही यामध्ये असल्याचे अध्यक्ष परीट यांनी सांगितले. कर्जाच्या वसुलीचे धनादेश महिन्याच्या २० ते २५ तारखेनंतर जमा होतात, त्याऐवजी १ ते ५ तारखेपर्यंत जमा व्हावेत, अशी मागणी संजय शिंदे यांनी केली.सेवेतून कमी केलेल्या अकरा कर्मचाऱ्यांच्या थकबाकीचे काय? अशी विचारणा उत्तम वावरे यांनी केली. यावर याबाबत संस्थेच्या बाजूने निकाल लागला असून, वसुलीसाठी दिवाणी न्यायालयात प्रकरणे असल्याचे संस्थेचे व्यवस्थापक व्ही. एन. बोरगे यांनी सांगितले. व्यवस्थापक व्ही. एन. बोरगे यांनी अहवाल वाचन केले. रवींद्र घस्ते यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष दिनकर तराळ यांनी आभार मानले.एम. आरसह संचालकांचे अभिनंदनरसातळाला गेलेली संस्था एम. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने कोट्यवधीच्या नफ्यात आणली. याबद्दल बहुतांशी सभासदांनी अभिनंदनाचे ठराव मांडले. त्याचबरोबर संस्थेची निवडणूक बिनविरोध करावी, असा आग्रह धरला.
जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची कर्जमर्यादा ३५ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 1:15 PM
zp Kolhapur-कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीची कर्जमर्यादा २५ लाखांवरून ३५ लाख रुपये करण्याचा निर्णय वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची ५४ वी वर्षिक सर्वसाधारण सभा रविवारी संस्था कार्यालयात ऑनलाईन घेण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजीव परीट होते.
ठळक मुद्देजिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची कर्जमर्यादा ३५ लाख ऑनलाईन सर्वसाधारण सभेत निर्णय