कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाºयांना गेल्या चार महिन्यांचे वेतन न मिळाल्याने हवालदिल झाले आहेत. वेतनाविना ‘दसरा’आणि ‘दिवाळी’चे सण घालवावे लागल्याने कर्मचाºयांमधून संताप व्यक्त होत आहे.जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांना सेवानिवृत्तीचे वेतन फारच कमी असते. तेही वेळेवर मिळत नसल्याने या कर्मचाºयांचे हाल होत आहेत. सध्या जुलै ते आॅक्टोबरचे वेतन मिळालेले नाही. याबाबत जिल्हा परिषदेच्या पातळीवर अनेक वेळा प्रयत्न करूनही दखल घेतली जात नसल्याची तक्रार जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघाची आहे. वेळेत वेतन न मिळाल्याने कौटुंबिक खर्च, औषधोपचारासाठी कर्मचाºयांकडे पैसे नाहीत. तब्बल चार महिन्यांचे वेतन थकविण्याचा विक्रम जिल्हा परिषदेने केला असून, नियमित कर्मचाºयांचे पगार देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे कसा येतो? असा सवालही संघाने केला आहे.
अकरा ते बारा कर्मचाºयांचे वेतन थकले आहे. बॅँकेकडून खात्री करून घेतल्यानंतर येत्या दोन-तीन दिवसांत चालू महिन्यासह प्रलंबित वेतन दिले जाईल.- राहुल कदम (उपमुख्य वित्त व लेखाधिकारी, जिल्हा परिषद)