कोल्हापूर : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवार, दि. १ जून रोजी दुपारी १ वाजता राजर्षी शाहू महाराज सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. नोटीसमध्ये जरी ही सभा ऑनलाईन होणार असल्याचा उल्लेख असला, तरी सर्वच सदस्य उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे.
गेल्यावर्षीही अशीच सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र भाजप, जनसुराज्यच्या सदस्यांनी तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात घुसखोरी केली होती. आता पदाधिकारी हे सभागृहात बसून आढावा घेणार असल्याने अन्य सदस्यही सभागृहात येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सभागृहालाही तयारी करावी लागणार आहे.
सध्या जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदलाचे वारे वाहत असून शिवसेनेच्या सभापतींचे राजीनामे दृष्टिक्षेपात आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर होणाऱ्या सर्वसाधारण सभेला सर्वच सदस्य ऑनलाईनपेक्षा प्रत्यक्ष हजर राहण्याला प्राधान्य देण्याची शक्यता आहे.
चौकट
अध्यक्षांच्या उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह
अध्यक्ष बजरंग पाटील हे गेल्या आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सर्वसाधारण सभेआधी त्यांना डी. वाय. पाटील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असला, तरी पुढे सात दिवस होम क्वारंटाईन बंधनकारक असल्याने ते सभेला येणार की नाही, याबाबत संभ्रम आहे.