शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेचा चढता आलेख

By admin | Published: June 21, 2015 9:58 PM

जिल्हा परिषदेच्या शाळा अगदी गुणवत्तेकडे झेप घेत असल्याचे दिसते. या मूल्यांकन मोहिमेतून जिल्ह्यातील काही गुणवंत आणि आदर्श शाळांचा आढावा आजपासून...

कोल्हापूर जिल्हा प्रगत आणि राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी परिवर्तन चळवळीचा. नव्या विचारांना समर्थपणे सामोरे जाणारा. शिक्षकांचे प्रयत्न, गुणवत्ता वाढीसाठी जिद्द, महत्त्वाकांक्षा आणि समयदान करण्यामुळे जिल्ह्यात ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांचे मूल्यांकन करून श्रेणी वर्गीकरण केले असता, जिल्हा परिषदेच्या शाळा अगदी गुणवत्तेकडे झेप घेत असल्याचे दिसते. या मूल्यांकन मोहिमेतून जिल्ह्यातील काही गुणवंत आणि आदर्श शाळांचा आढावा आजपासून...समाजाच्या प्रगतीसाठी केवळ शिक्षण नव्हे, तर दर्जेदार व गुणवत्तेचे शिक्षण आवश्यक आहे. हे ओळखून ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाचा ‘गुणवत्ता विकास कार्यक्रम’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला. प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकास कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राबविण्याचा निर्धार केला. विभागीय आयुक्तांपासून ते शिक्षकांपर्यंत गुणवत्ता वाढ करण्यासाठी विशेष प्रयत्न व त्या दृष्टीने वाटचाल दमादमाने सुरू केली. त्याचे फलित म्हणजे २०१३ पासून २०१५ पर्यंत ‘अ’ श्रेणीतील शाळांच्या संख्येत झालेली वाढ होय. शाळेचे व विद्यार्थ्यांचे मूल्यांकन वर्षातून एकदा करण्यात येते. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांचे स्वयंमूल्यमापन हे मूल्यांकन प्रपत्रकाच्या आधारे केले जाते. हे प्रपत्रकात अगदी विचारपूर्वक आणि शाळेच्या भौतिक सुविधा व विद्यार्थ्यांची गुणवत्ता या दोन्हींचा समावेश असे आहे. सातत्यपूर्ण व सर्वांगीण मूल्यांकन व्हावे म्हणून या प्रपत्रकामध्ये १८७ प्रश्न वा माहिती विचारली असून, त्या प्रत्येकास गुण ठेवलेले आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या वर्गकामांचे मूल्यमापनसुद्धा होते. एकूणच शाळा व विद्यार्थी, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती, शैक्षणिक उठाव या सर्व बाबींना निश्चित कालावधी देऊन केलेले मूल्यांकन शाळेच्या गुणवत्तेचा आरसा ठरतो.स्वयंमूल्यमापन हे प्रपत्रक ‘अ’च्या आधारे तालुका स्तरावर केले जाते. त्यासाठी प्रत्येक तालुक्याची समिती स्थापन केली आहे. तालुक्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन २०० गुणांचे करून गुणानुक्रमे पहिले तीन क्रमांक काढले जातात. गुणांच्या आधारे शाळांचे वर्गीकरण करण्यात येते ते असे - २०० गुणांपैकी ९० ते १०० टक्के ‘अ’ श्रेणी, ८० ते ८९ टक्के गुण म्हणजे ‘ब’ श्रेणी, ६० ते ७९ टक्के गुणांसाठी ‘क’ श्रेणी आणि ४० ते ५९ टक्के गुण मिळाल्यास ‘ड’ श्रेणी व शेवटची श्रेणी ‘इ’ साठी ० ते ३९ टक्के निर्धारित केले आहेत.नावीन्यपूर्ण उपक्रम, स्पर्धा परीक्षांची तयारी, संगणक व ई-लर्निंग, अप्रगत मुलांसाठी विशेष अध्यापन, लेखन-वाचन प्रकल्प, प्रयोगशाळा, कॉम्प्युटर लॅब, ग्रंथालय व पुस्तक वितरण वाटप नोंदी, एल.सी.डी. प्रोजेक्टर, इंटरनेट वगैरेंमुळे विद्यार्थ्यांचा शाळेकडे ओढा वाढलेला आहे. पर्यावरण, हात धुवा दिन, आॅक्सिजन पार्क, गांडूळ खत प्रकल्प, सुरेख बाग, देखणी इमारत हे सगळं पाहून जिल्हा परिषदेच्या शाळा अगदी गुणवत्तेकडे झेप घेत असल्याचे दिसते. शाळांना अजूनही खूप पल्ला गाठायचा आहे. तरीही गाठलेला गुणवतेचा चढता आलेख ‘रिमार्कबेल’च. - डॉ. लीला पाटीलवास्तव लक्षात आले ते असेबारा तालुक्यांतील फक्त १२ शाळा या २०१२-१३ मध्ये ‘अ’ श्रेणीमध्ये होत्या; मात्र शिक्षणाधिकारी भेट, केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकाऱ्यांचे प्रयत्न, निकालाचे चावडी वाचन, माता-पालक बैठका, पालकांचे उद्बोधन, जाणीव जागृतीसाठी प्रबोधन व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांचा क्रियाशील सहभाग यांमुळे प्राथमिक शाळांची गुणवत्ता वाढत गेली.शिक्षकांचे प्रयत्न, गुणवत्ता वाढीसाठी जिद्द व महत्त्वाकांक्षा आणि समयदान करण्यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावत आहे. त्याचा दृश्य परिणाम म्हणजे २०१२-१३ मध्ये फक्त १२ शाळा ‘अ’ श्रेणीमध्ये होत्या, त्या २०१४-१५ मध्ये २०६ पर्यंत पोहोचल्या आहेत.‘ब’ श्रेणीमधील शाळांची संख्या २०१२-१३ मध्ये ३४० होत्या. त्या वाढून १३२१ झाल्या. ‘क’ श्रेणीतील शाळांची संख्या १६१० वरून ४७८ इतकी कमी झाली आहे. २०१२-१३ मध्ये ‘ड’ श्रेणीतील शाळा ५८ इतक्या होत्या, तर २०१४-१५ मध्ये ती संख्या फक्त ० इतकी राहिली. ४विशेष प्रकर्षाने लक्षात आलेली बाब म्हणजे ‘इ’ श्रेणीत आता एकही शाळा आज राहिलेली नाही, असा हा गुणनिहाय उंचावलेला आलेख. सर्व शिक्षा अभियान, माझी समृद्ध शाळा, एक दिवस शाळेसाठी, प्रेरणा दिवस, हिरवी शाळा पुरस्कार यांसारखे उपक्रम राबविण्यात शिक्षण खात्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न ही यशासाठीची कारणे तर आहेत.