शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

जिल्हा परिषदेतील आज, उद्याची बदली प्रक्रिया स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 11:37 AM

कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये आज, गुरुवार आणि उद्या, शुक्रवार या दोन दिवशी होणारी मुख्यालयातील समुपदेशन बदली प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेतील आज, उद्याची बदली प्रक्रिया स्थगित२५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती

कोल्हापूर : जिल्हा परिषदेमध्ये आज, गुरुवार आणि उद्या, शुक्रवार या दोन दिवशी होणारी मुख्यालयातील समुपदेशन बदली प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी ही माहिती दिली.पूर्वनियोजनानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील सर्व संवर्गातील वर्ग ३ मधील कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या २३ व २४ जुलै रोजी करण्यात येणार होत्या. तसेच तालुकास्तरावर ३० व ३१ जुलै रोजी ही प्रक्रिया राबवण्यात येणार होती. मात्र २६ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे ही प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

तालुकास्तरावरील प्रक्रियेबाबत अजून बदल करण्यात आला नाही. मात्र जिल्हा परिषद मुख्यालयातील बदल्यांचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.२५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थितीकोरोनाच्या प्रादुर्भावाचा विचार करून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आज, गुरुवार, उद्या, शुक्रवार या दोन्ही दिवशी केवळ २५ टक्के कर्मचारी उपस्थितीचा निर्णय कायम करण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याzpजिल्हा परिषद