शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

जिल्हा परिषद करणार प्राथमिक शाळांचे ‘मार्केटिंग’

By admin | Published: May 26, 2015 12:28 AM

सोशल मीडियाचा होणार वापर : चांगल्या शाळांचे चित्रीकरण, व्हॉटस् अ‍ॅपवर क्लिप टाकणार

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर स्पर्धेत टिकण्यासाठी आणि पटसंख्या वाढविण्यासाठी येत्या जून महिन्यात आपल्याकडील प्राथमिक शाळांचे ‘मार्केटिंग’ करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. ‘राजर्षी शाहू शिक्षण समृद्धी’ कार्यक्रमांतर्गत उपक्रमशील आणि सर्व दृष्टीने दर्जेदार शाळांचे चित्रीकरण केले आहे. १२ मिनिटांची ही क्लिप सोशल मीडियावर, तसेच व्हॉटस् अ‍ॅपवर टाकून अधिकाधिक पालकांपर्यंत शाळांची प्रगती पोहोचविण्यात येणार आहे. जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या एकूण २००५ शाळा जिल्हा परिषदेच्या अखत्यारित चालतात. दरम्यान, दिवसेंदिवस इंग्रजी माध्यमातील शिक्षणाला अवास्तव महत्त्व आले आहे. सरकारी शाळांत दर्जेदार शिक्षण आणि सेवा, सुविधा मिळत नाहीत, असा समज आहे. त्यामुळे अलीकडे खासगी, इंग्रजी शाळेत पाल्याला दाखल करण्याकडे पालकांचा कल वाढला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील पटसंख्या झपाट्याने घसरत आहे. अनेक शाळांत पहिलीच्या वर्गात हाताच्या बोटावर मोजण्याइतकी मुले आणि मुली आहेत. परिणामी, अनेक शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे किमान गरीब, सर्वसामान्य, बहुजन या वर्गातील मुलांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळा वाचविणे काळाची गरज आहे. म्हणून उशिरा का होईना, जिल्हा परिषद गुणवत्ता सुधारण्यासाठी हा उपक्रम राबवत आहे. यंदाच्या जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात राजर्षी शाहू शिक्षण समृद्धी कार्यक्रमातून सर्व शाळांमध्ये गुणवत्ता आणि सर्वांगीद सुविधा देण्यासाठी १ कोटींची स्वनिधीतून तरतूद केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून चांगल्या शाळांचे मार्केटिंग केले जाणार आहे. राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा, टिटवे, तुरंबे, फेजिवडे, सरवडे, तर आजरा तालुक्यातील मडिलगे बुद्रुक, हरपवडे, शिरोळ तालुक्यात नांदणी, हातकणगंलेतील मिणचे, लाटवडे, करवीरमधील सरनोबतवाडी या विद्यामंदिर शाळांतील आणि शिंगणापूर निवासी शाळेचे डॉक्युमेंटरीसाठी चित्रीकरण केले आहे. दहा मिनिटांची डॉक्युमेंटरी तयार केली जाणार आहे. त्यातील दोन मिनिटांची क्लिप सोशल मीडियावर टाकण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियालाही देण्यात येणार आहे. कल्पकता आणि तंत्रज्ञानाच्या वापरातून तयार केलेली डॉक्युमेंटरी प्रत्येक शाळेत व विद्यार्थी, पालक मेळाव्यात दाखविण्यात येणार आहे. खासगी शाळांपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळा सर्वच बाबतीत कशा सरस आहेत, याची जागृती केली जाणार आहे. जून महिन्यात सर्व शाळेत ही डॉक्युमेंटरी दाखविण्यात येईल.- अभिजित तायशेटे, सभापती, शिक्षण विभागसर्वच शाळांतील गुणवत्ता वाढावी, यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. यंदा पटसंख्या वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे चांगल्या शाळांची कामगिरी सर्वच शाळेत पोहोचविण्यासाठी डॉक्युमेंटरी तयार केली आहे. - स्मिता गौड, प्राथमिक शिक्षणाधिकारी