कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राबविलेल्या प्रभावी उपक्रमांची दखल पुन्हा एकदा केंद्र शासनाने घेतली आहे. संपूर्ण देशभरामध्ये यातील उपक्रम राबवता यावेत यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना सादरीकरणासाठी मसुरी (उत्तराखंड) येथे दुसºयांदा पाचारण केले होते.
डॉ. खेमनार यांनी ७ मार्च २०१८ रोजी लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये या सर्व उपक्रमांबाबत सादरीकरण केले. केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरूप हे प्राथमिक शिक्षण स्तरावरील विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी गतवर्र्षी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ६ आणि ७ मार्च रोजी विशेष दौºयावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी देऊन प्राथमिक शिक्षण विभागाने राबविलेल्या विविध उपक्रमांची पाहणी केली होती.
कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळांनी स्वच्छ विद्यालय पुरस्कार उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक शाळांची केलेली नोंद, राजर्षी शाहू निवासी क्रीडा प्रशालेतील खेळाडूंनी विविध आंतरराष्ट्रीय, देश व राज्यपातळीवर मिळविलेले यश, जि.प.ने सुरू केलेली देशातील पहिली निवासी शाळा, आदी उपक्रम तसेच शिक्षण विभागामार्फत औद्योगिक, सामाजिक उत्तरदायित्व, लोकसहभाग अंतर्गत शाळांसाठी भरीव निधी उपलब्ध करून त्यातून नवीन शाळा इमारती, दुरुस्ती, मुलामुलींसाठी स्वच्छतागृहे, ई- लर्निंग साहित्य, शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून घेतले आहे. शिक्षकांना प्रशिक्षणे व कार्यशाळेमार्फत केले जाणाºया मार्गदर्शनाबाबत सादरीकरणामध्ये माहिती दिली. यावेळी उपसंचालक श्रीमती अश्वथी, उपसंचालक एस. श्रीधर, सर्व शिक्षा अभियानाच्या संचालिका सौम्या गुप्ता, ‘प्रथम’ संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुक्मिणी बॅनर्जी, उपस्थित भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांनी डॉ. कुणाल खेमनार यांचे अभिनंदन करून कोल्हापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.अर्थसंकल्प २२ मार्चला मांडणारकोल्हापूर : जिल्हा परिषदेचा सन २०१८-१९ चा अर्थसंकल्प गुरुवारी (दि. २२) मांडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी अन्य पदाधिकाºयांसह सर्व विभागांचा आढावा घेतला.यंदा अर्थसंकल्प ३० कोटींपर्यंत मांडला जाण्याची शक्यता आहे. येथील समिती सभागृहात मंगळवारी दुपारी दोन तास झालेल्या बैठकीत अध्यक्षा महाडिक यांनी प्रत्येक विभागाने खर्च केलेला निधी, आगामी आर्थिक वर्षातील नियोजन याची माहिती घेतली. यावेळी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, सभापती अंबरिष घाटगे, सर्जेराव पाटील पेरिडकर, विशांत महापुरे, शुभांगी श्ािंदे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. काही विभागांचा निधी शिल्लक राहणार आहे त्याचा विनियोग कसा करायचा यासह अनेक नावीन्यपूर्ण तसेच जिल्हा परिषदेचे उत्पन्नवाढीसाठीच्या योजनांबाबतही यावेळी चर्चा केली.