कोल्हापूर : कोल्हापूरजिल्हा परिषदेत शिवसेनेच्या वंदना जाधव, शिवानी भोसले, कोमल मिसाळ आणि अपक्ष रसिका पाटील या चार जिल्हा परिषद सदस्यांची सभापती म्हणून निवड करण्यात आली.मंगळवारी ही निवड करण्यात आली. शिवानी भोंसले यांच्याकडे महिला बालकल्याण, वंदना जाधव यांना बांधकाम आणि आरोग्य, कोमल मिसाळ यांना समाजकल्याण तर रसिका पाटील यांच्याकडे शिक्षण आणि अर्थ समिती देण्यात आले आहे.अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सर्व सदस्य पुन्हा पन्हाळ्यावर गेले. गेल्यावर्षी ठरल्याप्रमाणे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून दोन्ही वर्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची यादी असलेले पत्र देण्यात आले होते. त्यानुसार आबिटकर समर्थक वंदना जाधव आणि मंडलिक समर्थक शिवानी भोसले यांची पदे निश्चित आहेत. शिवसेनेच्या पत्रात समाजकल्याण पदासाठी कोमल मिसाळ आणि मनीषा कुरणे अशी दोन्ही नावे देण्यात आली होती. मात्र, चंद्रदीप नरके यांनी मात्र मिसाळ यांचे नाव निश्चित केले.चौथे समिती सभापतिपद हे सतेज पाटील ठरवणार होते, त्यांच्यासमोर अपक्ष सदस्य शिंगणापूरच्या रसिका पाटील यांचे नाव होते. चंदगड तालुक्यातून नुकतेच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेले कल्लाप्पा भोगण यांनीही सभापतिपदावर दावा केल्याने याचा निर्णय बाकी होता, मात्र मंगळवारी सतेज पाटील यांनी रसिक पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
ZP Election Kolhapur : वंदना जाधव, शिवानी भोसले, कोमल मिसाळ, रसिका पाटील नव्या सभापती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 12:23 PM
ZP Election Kolhapur : कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या वंदना जाधव, शिवानी भोसले, कोमल मिसाळ आणि अपक्ष रसिका पाटील या चार जिल्हा परिषद सदस्यांची सभापती म्हणून निवड करण्यात आली.
ठळक मुद्दे वंदना जाधव, शिवानी भोसले, कोमल मिसाळ, रसिका पाटील नव्या सभापतीचार जिल्हा परिषद सदस्यांची सभापती म्हणून निवड