शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
2
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
4
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
5
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
6
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
7
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
8
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
9
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
10
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
11
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
12
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
13
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
14
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
15
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
17
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
18
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
19
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
20
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या

Election: ZP, पंचायत समितीमध्ये जादा २७ जणांना राजकीय संधी, आघाड्यांसाठी सदस्यवाढ ठरणार वरदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 1:26 PM

निवडणुकांचा कार्यक्रम १५ दिवसांत जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर निवडणूक आयोगाने याबाबत तातडीने हालचाली सुरु केल्या आहेत.

समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या ९ जागा आणि पंचायत समितीच्या १८ जागा वाढणार असल्यामुळे काही तालुक्यांमधील राजकारणही बदलणार आहे. आजरा, भुदरगड, गडहिंग्लज आणि गगनबावडा या चार तालुक्यांमध्ये मात्र आहे तेवढेच गट आणि गण ठेवण्यात आले आहेत. उर्वरित आठ तालुक्यांमध्ये ही संख्या वाढत असल्याने राजकीय तडजोडीला पूरक वातावरण तयार होणार आहे.कोल्हापूरजिल्हा परिषदेची मुदत २० मार्च रोजी संपल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तत्पूर्वी मात्र जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता होती. या निवडणुकांचा कार्यक्रम १५ दिवसांत जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर निवडणूक आयोगाने याबाबत तातडीने हालचाली सुरु केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून थेट गट व गण रचनेचा कार्यक्रमच मंगळवारी जाहीर केला.सदस्य ६८ वरुन ७६ वरकोल्हापूर जिल्हा परिषदेचे याआधी ६७ सदस्य होते. मात्र वाढीव लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्यसंख्या वाढविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. त्यामुळे आठ तालुक्यांमध्ये ९ गट वाढणार असून ही संख्या आता ७६ होणार आहे, तर पंचायत समिती सदस्यांचीही संख्या १८ ने वाढणार आहे.

काय बदल होणार?जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी इच्छुकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे विविध पक्ष आणि आघाड्यांना इच्छुकांना संधी देण्यासाठी या वाढीव जागा उपयुक्त ठरू शकतात. महाविकास आघाडी जर एकत्रितपणे लढणार असेल, तर ज्या त्या तालुक्यात ताकदीनुसार जागा देण्याचा विचार होऊ शकतो. महाविकासकडून उमेदवारी नाही मिळाली, तर भाजप त्यांना संधी देऊ शकते. थोडक्यात, राजकीय महत्त्वाकांक्षा असणाऱ्या जादा २७ जणांना यामुळे संधी मिळणार आहे.

१२ पंचायत समित्यांत १५२ जागाजिल्ह्यातील १२ पंचायत समित्यांमध्ये याआधी १३४ सदस्य होते. परंतु ही संख्या आता १५२ वर जाणार आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी काँग्रेसकडे अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे. जिल्ह्यात एकूण सहा काँग्रेसचे आमदार असल्यामुळे ते साहजिक आहे. परंतु गृहपाठ सुरू आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर पुढची दिशा ठरवली जाईल. - सतेज पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस 

सध्या शिवसेनेचे १२ सदस्य जिल्हा परिषदेत आहेत. आम्ही सर्व ठिकाणाहून उमेदवार देण्याची तयारी केली आहे. मातोश्रीहून आदेश येईल, त्यानुसार आघाडी की स्वतंत्र, याचा निर्णय घेतला जाईल. - विजय देवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख

जिल्हा परिषद, पंचायत समिती डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्याचा दौरा केला आहे. सर्व जागांवर लढण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर जिल्हा पातळीवर कसा निर्णय होईल, त्यानुसार आघाडीबाबतचा विचार केला जाईल. - ए. वाय. पाटील जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

अजूनही निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. तरीही भाजपने तयारी सुरू ठेवली आहे. कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आणखी गती घेतली जाईल. - समरजित घाटगे, भाजप, ग्रामीण जिल्हाध्यक्ष

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकZP Electionजिल्हा परिषद