कोल्हापूर : व्यावसायिकांच्या दृष्टीने पर्सन टू पर्सन आऊटसोर्सिंग सेवा एकाच छताखाली मिळणे ही काळाजी गरज असून, ‘झीपीटीम’ कंपनीने सुरू केलेले कार्यालय कोल्हापूरच्या विकासाला नवीन दिशा देईल, असा विश्वास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केला.
आय. टी. पार्क येथे अद्ययावत सेवा सुविधा देणाऱ्या झीपीटीमच्या टेक्नोलॉजी सेंटरचे उद्घाटन डॉ. शिर्के यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेर, ‘झीपीटीएम’चे संस्थापक चेअरमन वसंत मनमाडकर, एस. एच. पी. प्रॉपर्टीचे चेअरमन शंकर पाटील, ‘झीपीटीम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राम पाटील, मौक्तिक पाटील, श्रीपाद बरिदे, रवींद्र खेबूडकर, उपनिबंधक महेश कदम आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : ‘झीपीटीम’ कार्यालयाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. यावेळी डाॅ. विलास नांदवडेकर, शंकर पाटील आदी उपस्थित होते. (फोटो-२३०२२०२१-कोल-झीपीटीम)