लातूर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने घेतलेल्या राष्ट्रीय लाेकअदालतमध्ये १ हजार ३११ प्रकरणे निकाली काढण्यात आली. जिल्ह्यात ३८ पॅनलच्या माध्यमातून हे कामकाज झाले.
लाेकअदालतीमध्ये माेटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, काैटुंबीक न्यायालय व ग्राहक मंच प्रकरणे, भू-संपादन, लवाद, हिंदू विवाह कायद्यांतर्गत प्रकरणे, कलम १३८ एनआय ॲक्ट प्रकरणे, काैटुंबीक हिंसाचार प्रकरणे, प्रलंबित असलेली तडजाेडपात्र दिवाणी व फाैजदारी प्रकरणे ठेवण्यात आली हाेती. वादपूर्व प्रकरणात सर्व बॅकांचे वसुली दावे, वित्त संस्था, भारत संचार निगम लिमिटेड यांची रक्कम वसुली प्रकरणे, वाहतूक ई-चलन प्रकरणे ठेवली हाेती. लाेकअदालत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा काेसमकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. लाेकअदालतीला पक्षकारांचा चांगला प्रतिसाद मिळाला, असे प्राधिकरणाच्या सचिव एस. डी. अवसेकर यांनी सांगितले.
वकील शिवाजी फड, एस. बी. आयनिले, बी. पी. राजमाले, सुचिता काेंपले, एस. एस. वैकुंठे, यू. एन. राऊत, बी. व्ही. गवळी, एस. जी. जगदाळे, व्ही. आर. पाटील, अशाेक साेनसाळे, एम. डी. ए. एम. मणियार, प्रजाता इमामदार, यू. पी. नाईक, सुनैना बायस, गुरुसिद्ध मिटकरी यांनी पंच म्हणून काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ॲड. विठ्ठल देशपांडे, उपाध्यक्ष ॲड. किरणकुमार टिकेकर, सचिव ॲड. दाैलत दाताळ, महिला उपाध्यक्ष ॲड. संगिता इंगळे, ॲड. रांदड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सव्वा काेटींची नुकसान भरपाई...विमा कंपन्यांच्या प्रकरणात तब्बल १ काेटी १५ लाखांची नुकसानभरपाई मिळाली आहे. ज्याेती आणि इतरांविरुद्ध कासीर यांच्यात हा वाद हाेता. दरम्यान, तडजाेडीअंती लाेकअदालतीत निकाली काढण्यात आला.
...यांच्या पॅनलसमाेर प्रकरणांचा निकाललातूर तालुक्यातील पॅनलवर न्या. आर. बी. राेटे, न्या. जे. एम. दळवी, न्या. आर. एम. कदम, तर जिल्हा न्यायाधीश पी. बी. लाेखंडे, न्या. के. एम. कायंगुउे, न्या. एस. एन. भाेसले, न्या. जे. सी. ढेंगळे, न्या. पी. टी. गाेटे, न्या. ए. एस. मुंडे, न्या. के. जी. चाैधरी, न्या. पी. एस. चांदगुडे, दिवाणी न्यायाधीश व. स्तर न्या. आर. एच. झा, न्या. जे. जे. माने, न्या. एम. डी. सैदाने, न्या. ए. एम. शिंदे दिवाणी न्यायाधीश क. स्तर यांनी कामकाज पाहिले.