लातूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अमोल उर्फ रत्नाकर बाबुराव प्रयाग (वय ५०) याला लातूरच्या सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बी.सी. कांबळे यांनी शुक्रवारी दहा वर्षाची सक्तमजुरी आणि ५०० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात ३० जानेवारी २०१७ मध्ये बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. दरम्यान, या खटल्यात सबळ पुराव्यासह साक्षीदारांची साक्ष महत्वाची ठरली आहे.
लातुरातील एमआयडीसी पाेलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्याला असलेल्या आराेपीने पीडित अल्पवयीन मुलगी आराेपीच्या मुलीसाेबत खेळण्यासाठी घरी आली हाेती. दरम्यान, आराेपी आमेल उर्फ रत्नाकर बाबुराव प्रयाग याने त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. ही घटना जानेवारी २०१७ मध्ये घडली. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरुन ३० जानेवारी २०१७ राेजी गुन्हा रजिस्टर नंबर ३३ / २०१७ कलम ३७६ (आय) (जे) भादंविचे सलकलम ४, ५ (एम), ६ (पाेस्काे) बाललैगिंग अत्याचार प्रतिबंध अधिनियम २०१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.
या गुन्ह्याचा तपासाधिकारी पाेलीस निरीक्षक माधवी मस्के, पाेलीस उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, पाेलीस उपनिरीक्षक सचिन इंगेवाड यांनी केला. गुन्ह्यातील बारकाव्याचा शाेध घेत, साक्षीदाराकडे सखाेर विचारपूस करुन, आराेपीविराेधात सबळ पुरावे, भाैतिक पुरावा गाेळा करुन, लातूर येथील विशेष सत्र न्यायालयात आराेपीविराेधात दाेषाराेपपत्र दाखल केले. न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान पाेलिसांनी सादर केलेले सबळ पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष महत्वाची ठरली. याप्रकरणी विशेष सत्र न्यायाधीश बी.सी. कांबळे यांनी आराेपी अमाेल उर्फ रत्नाकर बाबुराव प्रयाग याला शुक्रवारी दहा वर्षाची शिक्षा आणि ५०० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.
या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने वकिल मंगेश महिंद्रकर यांनी बाजू मांडली. सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी तोटेवाड यांनी मॉनिटरिंग केले. पोलीस अमलदार ज्योतीराम माने यांनी कोर्ट पैरवी केली. तर महिला पोलीस अमलदार शितल आचार्य, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी अधिक परिश्रम घेतले.